राकेश कलासागर नवे पोलीस अधीक्षक

By Admin | Updated: April 30, 2017 03:06 IST2017-04-30T03:06:17+5:302017-04-30T03:06:17+5:30

पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची नांदेडला बदली.

Rakesh Kalsangar New Superintendent of Police | राकेश कलासागर नवे पोलीस अधीक्षक

राकेश कलासागर नवे पोलीस अधीक्षक

अकोला : राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी काढण्यात आली असून, यामध्ये अकोल्याचे पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची नांदेड येथे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर येथील राकेश कलासागर अकोला जिल्हयाचे नवे पोलीस अधिक्षक म्हणून येणार आहेत.
चंद्रकिशोर मीणा यांनी अकोला पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ह्यऑन रोड पोलिसिंगह्ण एक चांगला उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी न्यायालयात गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण ३ टक्कय़ांवरून तब्बल ३0 टक्कय़ांपर्यंत वाढविले. यासोबतच कुख्यात गुंडांवर तडीपारी आणि मकोकाच्या कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे जिल्हय़ातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
यासोबतच त्यांनी अकोला पोलीस लॉन्स एक वेगळी भेट अकोलेकरांना दिली आहे. त्यांच्या बदलीनंतर नागपूर येथे कार्यरत असलेले राकेश कलासागर यांची अकोला पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Rakesh Kalsangar New Superintendent of Police