कोकेन प्रकरणातील नायजेरीयनसह दोघांना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 19:14 IST2017-10-16T19:11:32+5:302017-10-16T19:14:59+5:30
कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक चिक इजियानी व विजय हिरोळे या दोघांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

कोकेन प्रकरणातील नायजेरीयनसह दोघांना पोलिस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - कोकेन जप्ती प्रकरणात अकोल्यातील खरेदीदारांना कोकेनचा पुरवठा करणारा नायजेरियन इसम जेम्स ऊर्फ लुक चिक इजियानी व विजय हिरोळे या दोघांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकरनगरातील रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा नायजेरिया येथील ‘जेम्स’ ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा रोड नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर रामदास पेठ पोलीस व स् थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेम्सचा शोध घेत शनिवारी मुंबई तून अटक केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतांनी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही न्यायालयाने तात्पुरता अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे. त्यांच्या नियमीत जामीन अर्जावरील सुनावणी १६ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढककली.
-