किशोर खत्री हत्याकांड प्रकरण : चुंगडेचा जामीन अर्ज फेटाळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 02:26 IST2018-01-30T01:27:01+5:302018-01-30T02:26:06+5:30
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे अकोला न्यायालयात कामकाज पाहत आहेत.

किशोर खत्री हत्याकांड प्रकरण : चुंगडेचा जामीन अर्ज फेटाळला!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे अकोला न्यायालयात कामकाज पाहत आहेत.
सोमठाणा शेत शिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या हत्याकांड प्रकरणात सरतपासणी व उलटतपासणी सुरू असतानाच आरोपी रणजितसिंह चुंगडे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली असून, न्यायमूर्ती व्ही. एन. देशपांडे यांच्या न्यायालयाने चुंगडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ साक्षीदार तपासण्यात आले असून, त्यांची सरतपासणी व उलटतपासणी आटोपली आहे.