महाशिवरात्रीला आठ सापांना जीवनदान

By रवी दामोदर | Published: March 8, 2024 05:54 PM2024-03-08T17:54:35+5:302024-03-08T17:56:05+5:30

चार नाग, दोन घोनस, मन्यार व धामण आदींचा सामावेश.

giving life to eight snakes on mahashivratri | महाशिवरात्रीला आठ सापांना जीवनदान

महाशिवरात्रीला आठ सापांना जीवनदान

रवी दामोदर, अकोला : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवणी येथील सर्पमित्र संतोष वाकोडे यांनी विविध भागातून आठ सापांना पकडून जिवनदान दिले. त्यामध्ये चार नाग, दोन घोनस, एक मन्यार व एक धामण आदी सापांचा सामावेश आहे.
 

शिवणी येथील सर्पमित्र संतोष वाकोडे यांना साप निघाल्याची वार्ता कळताच स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध भागात जाऊन आठ सापांना पकडले. आतापर्यंत सर्पमित्र संतोष वाकोडे यांनी शेकडो सापांना पकडून जिवनदान दिले आहे. आतापर्यंत पकडलेल्या सापांना त्यांनी काटेपुर्णा अभय अभययाण्यात सोडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.‌ अनेक नागरिकांना त्यांनी भयमुक्त केले आहे. तसेच साप व मानव यांच्या संघर्षाविषयी ते नेहमीच जनजागृती करतात. त्यांच्या या धाडसी सामाजिक कार्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

Web Title: giving life to eight snakes on mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.