महिलेवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:23 IST2019-05-03T13:23:37+5:302019-05-03T13:23:49+5:30

अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली.

Gang rape on women | महिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेवर सामूहिक बलात्कार

अकोला: येवता ते मलकापूर रोडवरील एका कोरड्या खदानीत शहरातील एका ४५ वर्षीय महिलेवर पाच युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर तीन आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
एमआयडीसी परिसरात एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर ते दोघेही कैलास नगर परिसरात एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाइकांनी त्यांना विरोध केला; मात्र हा विरोध झुगारून त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुलाच्या मोठ्या भावाने दोघांनाही भेटून भाड्याच्या घरात राहून नका आपल्या घरी चला अशी भूलथाप देऊन तिला बुधवारी त्याच्या घरी नेण्यासाठी गेला. यावेळी त्याने सोबत तीन ते चार मित्रही नेले. महिलेला घराकडे घेऊन जात असतानाच ते येवता-मलकापूर रोडवरील अंधारातील एका खदानजवळ त्याचे मित्र थांबले होते. तेथे पोेहोचल्यावर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले. तिथे तिच्यावर त्यांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेला तिथेच सोडल्यानंतर तिला भोवळ आल्याने ती खाली कोसळली. त्यामुळे तिला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन महिलेचे बयान घेतले. घटनास्थळ पंचनामा करून त्यातील आरोपींचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. अद्यापही आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी सर्व आरोपी शिवणी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाºयांनी दिली.

 

Web Title: Gang rape on women