बेंजो पार्टीचे वाहन आणि ट्रकमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 10:43 AM2019-05-12T10:43:09+5:302019-05-12T10:43:27+5:30

राष्ट्रीय महामार्ग ६ वरील बाळापूर  बायपासच्या  भिकूंड नदी पुलाजवळ सकाळी  ६ वा बेंजे बँड पार्टी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

Benzo party vehicle and truck accident, one killed, 13 injured | बेंजो पार्टीचे वाहन आणि ट्रकमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, 13 जखमी

बेंजो पार्टीचे वाहन आणि ट्रकमध्ये अपघात, एकाचा मृत्यू, 13 जखमी

googlenewsNext

अकोला - राष्ट्रीय  महामार्ग ६ वरील बाळापूर  बायपासच्या  भिकूंड नदी पुलाजवळ सकाळी  ६ वा बेंजे बँड पार्टी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले. 

आज सकाळी बेंजे बँड पार्टीचे वाहन  क्र MH 28 A9180हा अकोल्याकडून खामगावकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( UP 70 FT9021)  ओव्हरटेक करताना पाठीमागून धडक दिल्याने सदर बेंजो वाहन हे रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात बेंजो वाहनाचा चालक शे. वहीत (  37 वर्षे, रा अकोट जि अकोला)  हा गाडी खाली दबल्याने मरण पावला.  तसेच सदर बेंजो वाहनामध्ये बसलेले एकूण 13 बँण्ड वादक हे जखमी झाले . जख्मीना जिल्हा  सर्व  सामान्य  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

Web Title: Benzo party vehicle and truck accident, one killed, 13 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला