अकोला : चाकू आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक

By राजेश शेगोकार | Published: June 5, 2023 12:56 PM2023-06-05T12:56:34+5:302023-06-05T12:56:48+5:30

दाेघांना ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आल्यावर हे दाेघेही युवक खदान अकाेला येथील रहिवाशी असल्याची माहिती समाेर आली.

Akola Two arrested for carrying knives and swords | अकोला : चाकू आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक

अकोला : चाकू आणि तलवार बाळगणाऱ्या दोघांना अटक

googlenewsNext

अकाेला : अकाेट तालुक्यातील दहीहंडा पाेलिस स्टेशन अंतर्गत कराेळी फाटा येथे एका ऑटाेमधून चाकू व तलवार सह प्रवास करणाऱ्या दाेघांना साेमवारी सकाळी अटक करण्यात आली. पाेलीसांनी धारदार चाकू व तलवार जप्त केला आहे. 

दहीहंडा पाेलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांना एका ऑटाेमधून दाेन युवक शस्त्रांसह प्रवास करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी सापळा रचून ऑटाेला  (क्रमांक एमएच ३० बीसी २५३७) कराेळी फाटयावर थांबविले. त्यावेळी नौशाद अली सकावत अली वय 30 वर्ष तसेच समीर खान हमीद खान वय 28 वर्ष या दाेघांकडे चाकू व तलवार आढळून आली.

दाेघांना ताब्यात घेऊन चाैकशी करण्यात आल्यावर हे दाेघेही युवक खदान अकाेला येथील रहिवाशी असल्याची माहिती समाेर आली. गेल्याच महिन्यात अकाेल्यात दाेन गटात उसळलेल्या हाणामारीची माेठी घटना झाली हाेती या पृष्ठभूमीवर पाेलीसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.  पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत करीत आहेत

Web Title: Akola Two arrested for carrying knives and swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.