अकोला विभागीय क्रिकेट संघ घोषित

By Admin | Updated: October 15, 2015 01:58 IST2015-10-15T01:58:38+5:302015-10-15T01:58:38+5:30

बुलडाण्याचा शुभम पाटील कर्णधारपदी.

Akola Divisional Cricket Association declared | अकोला विभागीय क्रिकेट संघ घोषित

अकोला विभागीय क्रिकेट संघ घोषित

अकोला: विदर्भ क्रिकेट संघटनेंतर्गत रामटेक येथे सुरू असलेल्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेकरिता १९ वर्षाआतील अकोला विभागीय संघाची घोषणा अकोला येथे करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदी बुलडाण्याचा शुभम पाटील याची निवड करण्यात आली. धनाजी नाना चौधरी, बीपीएड कॉलेज मलकापूर (बुलडाणा) येथे घेण्यात आलेल्या १९ वर्षाआतील दोन दिवसीय कसोटी आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतून अकोला विभागीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. स्पर्धा १ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली होती. निवड समिती सदस्य रणजी ट्रॉफी खेळाडू किशोर वाकोडे, मोहम्मद साबीर यांनी संघाची निवड केली. अकोला येथे व्हीसीए जिल्हा समिती सदस्य भरत डिक्कर यांनी संघाची घोषणा केली. आंतरविभागीय स्पर्धा रामटेक येथे १८ ऑक्टोबरपर्यंंत चालणार आहे. अकोला विभागामध्ये शुभम पाटील कर्णधार, गोपाल नीळे , रजत भोसले यष्टीरक्षक, जितू राजदेव, ओम सावळे, उमेश शेजोळ (सर्व बुलडाणा), वैभव लांडे (उपकर्णधार), प्रणव आठवले, शुभम येवतीकर, अक्षय शर्मा (सर्व अकोला), ज्ञानेश्‍वर देशमुख, नागराज जावळे, मयूर बोलवार, अक्षय गुडेवार (सर्व वाशिम) या खेळाडूंचा समावेश आहे.

Web Title: Akola Divisional Cricket Association declared