५0 वीज चोरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:52 IST2017-09-30T00:52:29+5:302017-09-30T00:52:34+5:30
अकोला : वीज चोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पावले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीनही विभागामध्ये थेट वीज चोरी व विजेचा गैरवापर करणार्या ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली.

५0 वीज चोरांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वीज चोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरण गंभीर असून, याविरोधात ठोस पावले उचलीत कारवाईचे सत्र सातत्याने सुरु ठेवीत २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यामध्ये महावितरणच्या पथकाने आकस्मिक कारवाई केली. यामध्ये अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण या तीनही विभागामध्ये थेट वीज चोरी व विजेचा गैरवापर करणार्या ५0 जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ व १२६ नुसार कारवाई करण्यात आली.
वीजहानी, गळती व वीज चोरी कमी करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृ त्वाखाली अकोला शहर, अकोट व अकोला ग्रामीण विभागामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र असलेल्या पथकाने या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
वीज मीटरमध्ये हस्तक्षेप करून व तारांवर आकडे टाकून थेट वीज चोरी करणार्या ग्राहकांमध्ये अकोला शहर विभागांतर्गत ५, अकोट विभाग १0, तसेच अकोला ग्रामीण विभागांतर्गत २८, अशा एकूण ४३ ग्राहकांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार, तर विजेचा गैरवापर व घेतलेल्या कारणाशिवाय दुसर्या कारणासाठी वापर करीत असल्याचे आढळून आलेल्या एकूण सात जणांवर भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १२६ नुसार कारवाई करण्यात आली. संबंधितावर कायद्यानुसार पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीसुद्धा अकोला जिल्ह्यामध्ये वीज चोरीविरुद्ध राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेमध्ये एकूण २९८ ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. वीज चोरी व गैरप्रकार याविरोधात महावितरण गंभीर असून, जिल्ह्यातील व शहरातील जास्त प्रमाण असणारी वीज चोरीची ठिकाणे निश्चित असून, या पुढे सुद्धा अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सा तत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांनी वीज चोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.