अकोला शहरातील किशोर खत्री हत्याकांडात १२ साक्षीदारांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 02:08 IST2018-01-25T02:08:32+5:302018-01-25T02:08:48+5:30
अकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनीही साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी केली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

अकोला शहरातील किशोर खत्री हत्याकांडात १२ साक्षीदारांची तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये दुतोंडे नामक प्रत्यक्षदश्री साक्षीदारासह मुख्य साक्षीदारांचा समावेश आहे. विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनीही साक्षीदारांची सरतपासणी व उलटतपासणी केली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सोमठाणा शेतशिवारात ३ नोव्हेंबर २0१५ रोजी किशोर खत्री यांची गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
या हत्याकांडप्रकरणी रणजितसिंग चुंगडे, रुपेश चंदेल, जसवंतसिंग चौहान ऊर्फ जस्सी, राजू मेहेरे हे आरोपी आहेत. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या प्रकरणात आरोपींच्या वकिलांनी दोन साक्षीदारांची साक्ष तपासली.
त्यानंतर जानेवारी महिन्यात ठेवलेली सुनावणी आरोपींचे वकील उपस्थित न होऊ शकल्यामुळे २२ ते २४ जानेवारी या चार दिवसांमध्ये घेण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आतापर्यंत १२ साक्षीदारांची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावली आता २२ व २३ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.