नगरच्या विष्णू खोसेने पटकावला युवा महाराष्ट्र केसरी किताब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 04:00 PM2017-05-31T16:00:17+5:302017-05-31T16:00:17+5:30

वाशीम येथे झालेल्या खाशाबा जाधव तिस-या युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरच्या विष्णू खोसे याने युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे

Young Maharashtra Kesari book by the city's Vishnu Khosne | नगरच्या विष्णू खोसेने पटकावला युवा महाराष्ट्र केसरी किताब

नगरच्या विष्णू खोसेने पटकावला युवा महाराष्ट्र केसरी किताब

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : वाशीम येथे झालेल्या खाशाबा जाधव तिस-या युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरच्या विष्णू खोसे याने सोलापूरच्या आकाश पुजारीला चीतपट करून युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. विष्णूच्या रूपाने नगरला पहिला युवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व वाशीम जिल्हा तालीम संघाच्या वतीने २८ मे ते ३० मे दरम्यान वाटाणे (जि.वाशीम) येथे कै.खाशाबा जाधव युवा राज्यस्तरीय अजिंक्यद कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुळचा अस्तगावचा (ता.पारनेर) व सध्या सारोळा कासार (ता.नगर) येथील रहिवाशी विष्णू विजय खोसे याने युवा महाराष्ट्र केसरी किताबासाठी सोलापूरच्या आकाश पुजारीशी लढत दिली, अवघ्या दुस-याच मिनिटात विष्णूने आकाशला फ्रंट साल्तो डावावर अस्मान दाखवून तिस-या युवा महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.

Web Title: Young Maharashtra Kesari book by the city's Vishnu Khosne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.