विसापूर कारागृहातून नवी मुंबईचा कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 05:36 IST2018-06-19T05:36:34+5:302018-06-19T05:36:37+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश ऊर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवारी सकाळी फरार झाला.

Navi Mumbai prisoner absconding from Visapur jail | विसापूर कारागृहातून नवी मुंबईचा कैदी फरार

विसापूर कारागृहातून नवी मुंबईचा कैदी फरार

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला कैदी महेश ऊर्फ बापू शिवाजी चव्हाण हा सोमवारी सकाळी फरार झाला.
तो दिवा- बेलापूर रोड (नवी मुंबई) येथील रहिवासी असून ठाणे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना चांगली वर्तणूकपाहून त्याला २०१३ मध्ये विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहात वर्ग करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी चहा पिण्याच्या बहाण्याने तो बराकीतून बाहेर पडला. त्यानंतर कारागृहाच्या पूर्वेकडील संरक्षक भिंतीवरून उडी मारून फरार झाला. कारागृह प्रशासनाने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Navi Mumbai prisoner absconding from Visapur jail