स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 10:22 IST2017-10-29T10:22:14+5:302017-10-29T10:22:22+5:30
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकलेल्या आवस्थेत आढळला.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी गळफास घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सावेडीतील जाँगिंग ट्रकच्या मैदानावरील झाडाला लटकलेल्या आवस्थेत आढळला.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये 'माझ्या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही', असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सहाय्यक फौजदार वाघमारे यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. वाघमारे हे एक महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. याप्रकरणी तोफखाना पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
कोपर्डी निर्भयाकांड, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. सहाय्यक फौजदार वाघमारे हे शांत स्वभावाचे व्यक्तीमहत्त्व होते. कायदेशीर माहिती असल्याने त्यांनी सेवाकाळात बहुसंख्य काळ पोलिस निरीक्षकांचे वाचक म्हणून काम पाहिले होते.