जिल्ह्यातील 32 वीज कर्मचा-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:44 AM2019-05-02T11:44:44+5:302019-05-02T11:44:56+5:30

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे

Honor to 32 employees in the district | जिल्ह्यातील 32 वीज कर्मचा-यांचा सन्मान

जिल्ह्यातील 32 वीज कर्मचा-यांचा सन्मान

अहमदनगर : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून महावितरण कर्मचा-यांच्या दैनंदिन कामात सातत्याने सुलभता आणत आहे. या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत कामात वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करावा व ग्राहक समाधानाचे ध्येय समोर ठेवून लोकसेवेचे व्रत पाळावे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. ब्रिजपालसिंह जनवीर यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचा-यांना मार्गदर्शन करतांना केले.
जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त परिमंडळ कार्यालयात आयोजित गुणवंत कर्मचा-यांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात जनवीर बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, संजय खंदारे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. विश्वास पाटील उपस्थित होते. जनवीर म्हणाले, कामाच्या ठिकाणी आंनदी वातावरण राहण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा. पुरस्कार म्हणजे चांगल्या कामाच्या पावतीसोबतच उत्कृष्ठ गुणांसाठी लावलेले रोपटे आहे. या रोपट्याचा कंपनी, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्या प्रगतीसाठी मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुरस्कार वितरण सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील 28 जणांना गुणवंत कामगार व 4 जणांना विशेष कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी
गुणवंत कर्मचारी पुरस्कार:- तुकाराम तोरमल, सुनील यादव, संभाजी पिसे, राहुल गागरे, विश्वास साळुंके, समीर टिभे, तुषार फुलारी, भरत गोसावी, प्रदीप वाघ, भीमराज उपळकर, प्रदीप शिंदे, पांडुरंग आरेकर, भानुदास शिरसाठ, सोमनाथ चोपडे, श्रीकांत गदादे, विनोद माने, तुषार हारेल, नारायण मेंगाळ, रमेश गडाख, काशिनाथ शिंदे, जीवन माने, संजय गायकवाड, विठ्ठल भांगरे, सीताराम खंडागळे, चेतन जाधव, चांगदेव थोरात, सचिन वानखेडे, नितीन गायके

विशेष कार्य पुरस्कार
मारुती काशीद, ज्ञानेश्वर बडदे, गणेश शिंदे, केतन कोरडे
 

Web Title: Honor to 32 employees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.