नगर-औरंगाबाद महामार्गावर धावत्या बसमधून हिंगोलीच्या प्रवाशाने फेकली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 13:48 IST2018-01-23T13:47:46+5:302018-01-23T13:48:17+5:30

पुण्याहून औरंगाबादकडे जाणा-या भरधाव बसमधून एका प्रवाशाने अचानक उडी घेऊन जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. 

Hingoli passenger jumped from the bus on the Nagar-Aurangabad highway | नगर-औरंगाबाद महामार्गावर धावत्या बसमधून हिंगोलीच्या प्रवाशाने फेकली उडी

नगर-औरंगाबाद महामार्गावर धावत्या बसमधून हिंगोलीच्या प्रवाशाने फेकली उडी

नेवासा : पुण्याहून औरंगाबादकडे जाणा-या भरधाव बसमधून एका प्रवाशाने अचानक उडी घेऊन जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत या प्रवाशाला नगरमधील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुणे-जामोद (बस क्रमांक- एमएच ४०, वाय-५८६२) या बसमधून श्रीपती हनवटे (रा. घोषी ता.औंढा, जि.हिंगोली) हा प्रवाशी पुण्याहून बसला होता. ही बस नेवासा तालुक्यातील शिंगणापूर फाटा ते कांगोनी फाटा या दरम्यान आली असताना श्रीपती हनवटे या प्रवाशाने बसच्या खिडकीतून खाली उडी मारली. बसचालक आणि इतर प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच बस थांबविण्यात आली. बस चालकाने पोलिसांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. काही वेळातच शिंगणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्रीपती हनवटे या प्रवाशाच्या खिशातील मोबाईलवरुन पोलिसांनी हनवटे याच्या नातेवाईकांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी हनवटे याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title: Hingoli passenger jumped from the bus on the Nagar-Aurangabad highway