मोर्चा, आंदोलनाचा सोमवार
By Admin | Updated: August 12, 2014 01:58 IST2014-08-12T00:59:17+5:302014-08-12T01:58:00+5:30
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, आदिवासी पारधी समाज परिवर्तन परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानवी हक्क अभियानच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी

मोर्चा, आंदोलनाचा सोमवार
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ, आदिवासी पारधी समाज परिवर्तन परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मानवी हक्क अभियानच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात आले़ तर मनसेने विविध मागण्यांसाठी नळदुर्ग नगर पालिकेवर मोर्चा काढला़ वाशी येथे धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये मेंढ्याही सहभागी करण्यात आल्या होत्या.
आदीवासी पारधी समाज परिवर्तन परिषदेच्या वतीने शहरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात अध्यक्ष पंडित भोसले, कार्याध्यक्ष अनिल काळे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते़ मानवी हक्क अभियानच्या वतीने गायरान जमीन नावे करावी, या प्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी अध्यक्ष बजरंग ताटे, सचिव माया शिंदे, दादाराव कांबळे, सुरेश कांबळे, ताराबाई कसबे, सुमन काळे, वाल्मिक सगट यांची उपस्थिती होती़
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठ्या कर्जदारांवर गुन्हे दाखल करून कर्जवसुली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे़ या उपोषणात जिल्हाध्यक्ष इंद्रजित देवकते, जिल्हा सचिव संजय यादव, बाळासाहेब कोठावळे, नाना पडघम, सुजित साळुंके, आबा ढवळे, प्रदीप सुर्यवंशी, हेमंत पाठक आदी पदाधिकारी सहभागी झाले आहेत़ तर महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या उपोषण आंदोलनात सरचिटणीस प्ऱए़वानखेडेकर यांच्यासह एस़ एम़ तोटावार, डी़आऱजाधव, जी़व्ही़सस्ते, जी़व्ही़वडणे आदी सहभागी झाले आहेत़
नळदुर्ग येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, एसक़े़जहागीरदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शासनाचा निधी व लोकवाटा घेवून नगर पालिकेने घरकूल योजना पूर्ण केलेली नाही, प्रभारी मुख्याधिकाऱ्यांमुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे प्रकार थांबवावेत जोरदार मागणी एस़ के़ जहागिरदार यांनी यावेळी केली़ मोर्चात जिल्हा सचिव अमरराजे कदम, शहराध्यक्ष ज्योतीबा येडगे, बशीर शेख, रमेश घोडके, आलीम शेख, दत्तात्रय धारवाडकर, गौस कुरेशी, अरूण जाधव, तानाजी खलाटे, निलेश मुळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते़
राज्यातील धनगर समाजाला महाराष्ट्र शाससनाने अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने वाशी येथील पारा चौकातून सवाद्य मोर्चा काढून तो शिवाजीनगर, लक्ष्मीरोड मार्गे तहसील कार्यालयावार नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळणही केली. मोर्चात माजी सरपंच दिलीप लगास, विजयसिंह तागडे, विक्रम पितळे,तुळशीदास करडे, अॅड.हनुमंत भोंडवे, उमेश खडके, अमोल केळे, वैजिनाथ वैद्य, प्रकाश कोरडे, समाधान ढेंगाणे, प्रभाकर सलगर, बापू केळे, शंकर केळे, मंगेश शिंपले, तानाजी पाटील, मंगल पितळे, पं.स.सदस्य अरूणा करडे, कावेरी लगास यांच्यासह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
दरम्यान, याच मागणीसाठी लोहारा तालुक्यातील अचलेर येथेही मोर्चा काढण्यात आला. यात दुशाकांत राघोजी, सुनील मदने, हिराकांत सोलंकर, विजय रूपनूर, मारूती जामगे, शिवा जामगे, अनिल सोलंकर, सुनील ठेंगील आदी सहभागी झाले होते. (ठिकठिकाणचे वार्ताहर)