शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ‘देशी पव्वे’

By admin | Updated: July 16, 2016 02:33 IST

जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख

बाटल्यांचा खच : पाणीपुरवठा विभागाजवळच साधला जातो कार्यभाग रवींद्र चांदेकर यवतमाळ जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यप्रवण करून जनताभिमुख करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मात्र त्यांच्याच कक्षाच्या वर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळील पुरूषांच्या प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे पडून असल्याचे दिसून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी नुकताच सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड्रेस कोड’ लागू केला. आता सर्वच कर्मचारी एकाच गणवेशात दिसू लागले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेत शाळा भरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंगला यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. याप्रमाणेच सिंगला यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जनतेची कामे तातडीने करण्याची तंबी दिली आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी कंबर बसली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी एकीकडे प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांच्याच कक्षाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या पाणी पुरवठा विभागाजवळ सावळागोंधळ दिसून येत आहे. पाणी पुरवठा विभागाला लागूनच पुरूषांचे प्रसाधनगृह आहे. या प्रसाधनगृहाच्या एका बाजूच्या संरक्षक भिंतीवर चक्क देशी दारूचे काही रिकामे पव्वे आडवे पडून आहेत. ते तेथे नेमके कसे आले, याचे गूढ मात्र गुलदस्त्यातच आहे. शुक्रवारी हे रिकामे पव्वे आढळले. या माळ्यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय आहे. लगतच कार्यकारी अभियंत्यांचा कक्ष आहे. ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना येथूनच कार्यान्वीत होतात. पाणी हेच जीवन आहे. तेच पाणी दारूतही टाकण्यात येते. नेमक्या त्याच पाणी पुरवठा विभागाजवळील प्रसाधनगृहात देशी दारूचे रिकामे पव्वे आढळून आल्याचे नेमके इंगित काय असा प्रश्न आता पुढे आला आहे. दारूचे पव्वे नेमके कुठून आले, त्याचा शोध घेणेही महत्वाचे आहे. इतर कार्यालयातही अशीच अवस्था यवतमाळ शहरात विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयातील प्रसाधनगृहात शिरल्यास तेथेही जिल्हा परिषदेसारखेच दृश्य दिसून येते. अनेकदा बाहेरुन येणारे नागरिकही आपला डाव साधतात. मात्र त्याचे खापर कर्मचाऱ्यांच्या माथी फोडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखाने कार्यालयीन स्वच्छतेसोबतच प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेकडे आणि सुरक्षेकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जिल्हा परिषदे सारखे त्यांच्या कार्यालयाच्या प्रसाधनगृहाजवळ देशीचे पव्वे आढळू शकतात. जबाबदारी कुणाची ? यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा केली असता ही जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असल्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठाकडे विचारणा केली असता त्यांनी बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची असा प्रश्न आहे.