शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे साडेपाच हजार शिक्षक बदलीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:11 IST

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी आपल्यास्तरावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने ...

ठळक मुद्दे३१ मेची डेडलाईन : २० मार्चपर्यंत अंतिम यादी

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजारांच्यावरील शिक्षक बदलीपात्र ठरले आहे. या शिक्षकांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी येत्या ३१ मार्चपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांना ३१ मेपूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी आपल्यास्तरावर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा परिषदेने पंचायत समितीस्तरावर बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रकाशित करून त्यावर दावे व हरकती मागितल्या होत्या. ही प्रक्रिया नुकतीच संपल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी पप्पू भोयर यांनी सांगितले. आता जिल्हास्तरावरील अंतिम सेवा ज्येष्ठता यादीकडे बदलीपात्र शिक्षकांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेत जवळपास आठ हजारांच्यावर शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या बदल्या झाल्या नाही. त्यामुळे काही संघटनांनी बदल्या करण्याची मागणी रेटली होती. तथापि काही संघटनांचे पदाधिकारी मात्र विविध कारणांनी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे गेली तीन वर्षे ही प्रक्रिया रखडल्याचे दिसून येत आहे. सामान्य शिक्षकांना बदली व्हावीच, अशी अपेक्षा आहे. शासनाने त्यादृष्टीने यावर्षी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे.येत्या २० मार्चपूर्वी जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. या यादीवर शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आक्षेप, हरकती, दुरुस्तीबाबत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यावर सीईओंच्या निकालानंतर अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांच्या आॅनलाईन पद्धतीने बदल्या होणार असल्याचे सांगितले जाते.बदल्या होणार असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आॅनलाईन बदल्यामुळे घोडाबाजारात ब्रेक लागणार आहे. प्रशासन कशा पद्धतीने पारदर्शक बदल्या करतात आणि योग्य न्याय देतात याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.सामान्य शिक्षकांना हवी बदलीकाही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यवतमाळ शहरालगतच्या शाळा मिळविण्यासाठी नेहमी बदली प्रक्रियेत खोडा घालतात. त्यामुळे इतर हजारो शिक्षकांवर अन्याय होतो. अनेक शिक्षक गेल्या काही वर्षांपासून दुर्गम भागात सेवा देत आहे. त्यांना आता बदलीची प्रतीक्षा आहे. सामान्य शिक्षक कोणत्याही स्थितीत बदल्या व्हाव्याच या मानसिकतेत दिसून येत आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा