शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत राहणार ६१ गट

By admin | Updated: August 26, 2016 02:26 IST

जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेसाठी ६१ गट राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक विभागाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी जागांच्या आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाने घोषित केला आहे. २३ सप्टेंबरला विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. पुढील १५ दिवसांत गट आणि गणांचे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी ६२ गट आणि १२४ गण होते. मात्र आता २०१७ च्या निवडणुकीत ६१ गट आणि १२२ गण राहणार असल्यावर निवडणूक विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. तथापि त्यासंबंधी अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही.यवतमाळ तालुक्यातील वडगाव गट या निवडणुकीत रद्द झाला आहे. या गटातील दोन गणही आता रद्द होण्याची शक्यता आहे. परिणामी यवतमाळ तालुक्यातील एक जिल्हा परिषद सदस्य कमी झाला असून पंचायत समिती सदस्यही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र पंचायत समितीचे गण कमी होतील, की नाही याबाबत अद्याप साशंकता आहे. संबंधित गणात समाविष्ट इतर गावांना दुसऱ्या गणात समाविष्ट करण्यात येईल, की तो गण दुसऱ्या नावाने तसाच राहील, याबाबतही संभ्रम कायम आहे. येत्या ९ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पूर्ण होणार आहे. त्यावेळीच गट आणि गणांची स्थिती स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)