शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक २१ सप्टेंबरला

By admin | Updated: August 27, 2014 23:52 IST

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच पंचायत समिती व जिल्हा परिषदेत खांदेपालट होणार आहे. पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. सभापतीची निवडणूक १४ सप्टेंबरला होवू घातली आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असून त्याची निवडणूक २१ सप्टेंबरला होणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सभापती, अध्यक्षाची निवडणूक जाहीर झाल्याने विधानसभेच्या रणधुमाळीतच स्थानिक पातळीवरही राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्याही हालचाली सुरू आहे. मात्र असा प्रयत्न महापौर आणि नगराध्यक्ष यांच्या निवडणुका लांबवित असताना फसला होता. त्यामुळे या वेळेस राज्य शासनाकडून कोणता पवित्रा घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान २६ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचा निवडणूक कार्यक्रम देण्यात आला आहे. पंचायत समितीत १४ सप्टेंबरला आणि जिल्हा परिषदेत २१ सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी विधानसभेचीही निवडणूक आचारसंहिता जाहीर होणार आहे. आताच विधानसभेच्या उमेदवारीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अंतर्गत हालचाली वाढल्या आहे. अशातच जिल्हा परिषद, पंचायत समितीत होणारा खांदेपालट ही स्थानिक नेतेमंडळींची कसोटी ठरणार आहे. कोणाला डावलायचे आणि कोणाला निवडायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे राहणार आहे. काही आठवड्यातच निवडणूक असल्याने नाराजी ओढवणेही नेत्यांना परवडण्यासारखे नाही. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापतांना राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजप यांना सोबत घेवून सत्ता स्थापन केली होती. आता काँग्रेस, राष्ट्रवादी राज्यातील निवडणुका आघाडीत राहूनच लढणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय उरणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्षाचे पद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसकडे बाभूळगाव तालुक्यातील पहूर सर्कलच्या अर्चना कोडापे आणि फाळेगाव-घारफळ सर्कलच्या योगीता कोडापे या दोन महिला आहेत. राष्ट्रवादीकडे पुसद तालुक्यातील काकडदाती सर्कलच्या डॉ.आरती फुफाटे या एकमेव महिला आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे अध्यक्ष निवडायचा झाल्यास काँग्रेसचे संख्याबळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवरही मोठे बेबनाव निर्माण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)