शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत अखर्चित निधी गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 21:34 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी अखर्चित निधीवरून सदस्यांनी प्रशासनाला धरेवर धरले. या सभेला अनुपस्थित दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देस्थायी समिती सभा : दोन अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी अखर्चित निधीवरून सदस्यांनी प्रशासनाला धरेवर धरले. या सभेला अनुपस्थित दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब झालेली स्थायी समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. या बैठकीत सुरुवातीलाच प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुपस्थित असल्याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा रजा न टाकता अनुपस्थिती दर्शविल्याचा आरोप सदस्यांनी केला. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस बजावण्याचे आदेश दिले. यानंतर अखर्चित निधीवरून सभेत घमासान सुरू झाले.गजानन बेजंकीवार, श्रीधर मोहोड आदींनी अखर्चित निधीबाबत प्रशासनाला जाब विचारला. कोणत्या विभागाकडे नेमका किती निधी अखर्चित आहे, याची त्यांनी मागणी केली. मात्र प्रशासनाकडे अखर्चित निधीचा ताळमेळ जुळत नव्हता. २०१५-१६ चा अखर्चित निधी शासनजमा होणार असून तो परत मिळणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावर सदस्यांनी निधी अखर्चित राहण्यासाठी जबाबदार कोण, वित्त विभागाने नेमके काय केले आदी प्रश्न उपस्थित केले. हा निधी शासन परत देणार नसल्याने जिल्ह्यातील विकास कामांना खीळ बसल्याचा आरोप त्यांनी केला.शेतकरी ट्रॅपपासून वंचितबोंडअळीचा मुकाबला करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर प्रकाश ट्रॅप दिले जाणार होते. मात्र कृषी विभागाने या ट्रॅपचे वाटपच केले नाही, असा आरोप सदस्यांनी केला. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच निधी अखर्चित राहून तो शासनजमा होण्याची भीती सदस्यांनी व्यक्त केली. त्यातच जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला.