शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकस्तरपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:53 IST

आदिवासी, नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा तत्काळ लाभ देण्याचे निर्देश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहे.

ठळक मुद्देग्रामविकास विभागाचे पत्र : न्यायालयाचे आदेश पाळण्याचे निर्देश

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : आदिवासी, नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा तत्काळ लाभ देण्याचे निर्देश ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले आहे. जिल्हा परिषदेचे शेकडो कर्मचारी अद्याप एकस्तरपासून वंचित आहे.राज्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाºयांना शासनाने ६ आॅगस्ट २००२ पासून एकस्तर वेतनश्रेणी लागू केली. मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अचानक ही वेतनश्रेणी बंद केली. त्यामुळे काही कर्मचारी व संघटनांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ४ जुलै २०१७ रोजी निर्णय देत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाºयांना एकस्तर वेतनश्रेणी तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले. सोबतच त्यांच्या वेतन निश्चितीची कारवाई दोन महिन्यांच्या आता पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.उच्च न्यायालयाने निर्णय देऊन आता जवळपास आठ महिने लोटले आहे. मात्र अद्यापही यवतमाळच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यातील हजारो कर्मचारी एकस्तर वेतनश्रेणीपासून वंचित आहेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामसेवकांनाही या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नाही. आता ग्रामविकास व जलसंधारण विभागाने सर्व विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठविले आहे. त्यातून आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकस्तर व वरिष्ठ वेतणश्रेणीचा लाभ मंजूर करण्याचे आदेश दिले आहे.हा तर न्यायालयाचा अवमानउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४ जून २०१७ रोजी निर्णय देऊन दोन महिन्यांच्या आत कारवाईचे आदेश दिले. मात्र आठ महिने लोटूनही अनेक कर्मचाºयांचा या वेतनश्रेणीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे एकप्रकारे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे कर्मचाºयांकडून बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिकाही दाखल केली होती. मात्र ग्रामविकास सचिवांनी न्यायालयापुढे हजर होऊन त्वरित लाभ देण्याची ग्वाही दिल्याने ही याचिका मागे घेण्यात आली होती. तरीही शेकडो कर्मचारी या वेतनश्रेणीपासून वंचितच आहे.