शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

एक शून्य शून्य... टवाळखोरांमुळे बिझी

By admin | Updated: August 7, 2016 01:05 IST

संकटाच्या काळात देवासोबतच कोणताही माणूस धावा करतो तो पोलिसांचा. या क्षणात पोलिसांची मदत...

हेल्पलाईनवर पोलिसांचीच चेष्टा : शिवीगाळ आणि धमकीही सुरेंद्र राऊत यवतमाळ संकटाच्या काळात देवासोबतच कोणताही माणूस धावा करतो तो पोलिसांचा. या क्षणात पोलिसांची मदत मिळविण्यासाठी १०० हा क्रमांक अनेकांना जवळचा वाटतो. या क्रमांकावर आलेल्या कॉलची दखलही तत्काळ घेतली जाते. टवाळखोरांनी आता हा १०० क्रमांक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. अनावश्यक फोन कॉल येत असल्याने खऱ्या संकटग्रस्ताला मदत मिळणे दुरापास्त ठरू पाहात आहे. जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या या क्रमांकावर फोन कॉल करून चक्क पोलिसांनाच वेठीस धरले जात आहे. रस्त्यावर वाहतुकीस खोळंबा निर्माण झाला तरी प्रत्येक जण सरळसोटपणे पोलिसांनाच दोषी ठरवतो. सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील जनतेच्या रोषाला सर्वाधिक बळी ठरणारी पोलीस यंत्रणा आहे. या यंत्रणेकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा असतात. मात्र नागरिक म्हणून स्वत:ची जबाबदारी प्रत्येक जण सोईस्करपणे विसरतो. याचा प्रत्यय जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर या क्रमांकावर येत असलेल्या फोन कॉल्सवरून दिसून येते. आज समाजात पोलिसांची प्रतिमा ही सर्वच स्तरातून खलनायकासारखीच बिंबविण्यात आली. त्यामुळेच कदाचित पोलिसांची चेष्टा करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे भयावह वास्तव अनुभवास येते. अडचणीत असलेल्या व्यक्तींना तत्काळ मदत मागता यावी, यासाठी २४ तास सुरू असणारा १०० नंबर आहे. कोणालाही कुठेही तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस यंत्रणेने ही सुविधा निर्माण केली आहे. आता या सुविधेचा उपयोग करमणुकीचे साधन म्हणून केला जात आहे. ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबरवर येणाऱ्या कॉलचा खुद्द अनुभव घेतला. यामध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनाच फोरवरून शिवीगाळ केली जाते. अनेकदा तर ‘तुम्ही मोबाईल रिचार्ज करता का?’ अशी विचारणा होते. नुसता कॉल लावून फोन ठेवला जातो. अर्धा मिनिटही हा फोन शांत नसतो. सातत्याने त्यावर कॉल येत असतात. नागपूर आणि चंद्रपूर येथून मोठ्या प्रमाणात कॉल येतात. त्यावर उडवाउडवी केली जाते. कोठून बोलता, याचे उत्तर कोणीच देत नाही. कधी तरी मध्यरात्री मिसकॉल का दिला म्हणून फोन घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालाच शिवीगाळ केली जाते. असे अनेक कॉल तासाभरात अनुभवायला मिळाले. पोलिसांशी खेळ करणारे क्रमांक दिसतात. त्याची नोंदही रजिस्टरमध्ये केली जाते. मात्र, कारवाई कुणाकुणावर करायची, हा प्रश्न आहे. नित्याचीच बाब म्हणून कर्मचारी आता या फोनकडे बघतात. या गोंधळामुळे खऱ्या अडचण असलेल्या व्यक्तीला मदत मिळणे कठीण होऊन बसले आहे. जबाबदारीचे भान नसलेल्यांकडून १०० नंबरचा मनमानी वापर सुरू आहे. कधी कधी तर पती-पत्नीच्या घरगुती भांडणाचे ‘लाइव्ह टेलिकॉस्ट आॅन कॉल’ ऐकविले जाते. या सर्व प्रकारामुळे १०० नंबरवर कार्यरत असलेला कर्मचारी पुढची व्यक्ती बोलल्याशिवाय ‘हॅलो’ म्हणण्यासही धजावत नाही.