लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सोमवारी होत असलेल्या मतदानाकडे धारकान्हा गावातील गावकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा क्षेत्रातील महागाव तालुक्याच्या टोकाला असलेल्या या गावात आतापर्यंत शून्य मतदान झाले आहे.या गावातील बूथ क्र. ३६ वर कुणीही मत देण्यासाठी आलेले नाही. प्रशासनाकडून नागरी सुविधा उपलब्ध न झाल्याने गावकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. या ठिकाणी एकूण २२७ मतदार असल्याची माहिती रेकॉर्डिंंग अधिकारी रमेश पिजारे यांनी लोकमतशी बोलताना दिली.जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरक्षितरीत्या पार पडावी यासाठी झोन तयार करण्यात आले आहे. वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहेत.
Maharashtra Election 2019; यवतमाळ जिल्ह्यातील धारकान्हा गावात शून्य टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:31 IST
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सोमवारी होत असलेल्या मतदानाकडे धारकान्हा गावातील गावकऱ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे.
Maharashtra Election 2019; यवतमाळ जिल्ह्यातील धारकान्हा गावात शून्य टक्के मतदान
ठळक मुद्देमतदारांनी फिरवली पाठ