शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

झरी तहसीलचा कारभार ढेपाळला ; ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: November 29, 2014 23:28 IST

झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते.

शिबला : झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते. झरी तालुका अतिदुर्गम आहे. त्यामुळेच ग्रामस्थांची कामे तातडीने आणि जलदगतीने व्हावी म्हणून झरी येथे तहसीलची निर्मिती करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीमुळे या कार्यालयाचा कारभार ढेपाळला आहे. ग्रामस्थांना तास न् तास नायब तहसीलदाराची वाट बघावी लागत आहे. हा प्रकार आता नेहमीचाच झाला. तहसीलदारच जर कार्यालयात उशिरा पोहोचत असतील, तर इतर अधिकारी, कर्मचारी त्यांचे अनुकरण करणारच आहे.शुक्रवारी २८ नोव्हेंबरला झरी तहसील कार्यालयाचा फेरफटका मारला असता, या सर्व बाबींचा प्रत्यय आला. शुक्रवारी चक्क दुपारी १२.३० वाजतापर्यंत या कार्यालयात जबाबदार अधिकारी उपस्थित झाले नव्हते. कर्मचारी तुरळकच उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता दोनही नायब तहसीलदारांच्या कक्षांना कुलूप लागले होते. तहसीलमधील अनेक टेबल कर्मचाऱ्यांविना होते. मात्र तालुक्यातील ग्रामस्थ रोजमजुरी सोडून त्यांची वाट बघत ताटकळत होते.तालुक्यातील ज्येष्ठ व निराधार व्यक्ती या कार्यालयात गोळा झाले होते. कुणाला जातीचा तर कुणाला उत्पन्नाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्र्े हवी होती. मात्र संवेदनाहिन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे त्यांना ताटकळत बसावे लागले होते. अनेक निराधार व वृद्ध उपाशीपोटी अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट बघत होते. यााकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. (वार्ताहर)