टाकळी तलावची घटना : चार संशयितांना अटकयवतमाळ : शहरालगतच्या टाकळी तलाव येथे मासेमारीवरून दोन गटांत वाद झाला. यात युवकाचा लाकडी बॅटने मारून खून करण्यात आला, तर एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना गुरुवारी ५.३० च्या सुमारास घडली. माधव नंदू वाघदरे (३५) रा.नारिंगीनगर असे मृताचे नाव आहे. टाकळी तलावातील मासेमारी सोसायटीत मासे पकडण्यावरून दोन गटांत वाद होता. माधवला सोसायटीने मासेमारी करण्यास विरोध केला होता. यानंतरही तो सहकाऱ्यासह मासेमारी करत होता. याचा वचपा काढण्यासाठी सोसायटीतील दुसऱ्या गटाने माधववर हल्ला केला. त्याला बॅट आणि लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी नंदूचे दोन सहकारी मासेमारी करत होते. हल्ला झाला तेव्हा ते मदतीसाठी धावून येऊ शकले नाही. हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करत एक जण पळून गेला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळ गाठले. टोळी विरोधी पथकाने संशयितांची धरपकड सुरू केली. आरोपीत माधव वाघदरेच्या नात्यातील काहींचा समावेश आहे. डोर्लीपुरा येथून तीन आणि बालाजी चौकातून एक अशा चार संशयितांना ताब्यात घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)
मासेमारीच्या वादातून युवकाचा खून
By admin | Updated: October 14, 2016 03:00 IST