शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अज्ञात वाहनाच्या धडकेने युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:48 IST

डिझेल चोरी करणाऱ्याला रंगेहाथ पकडले वणी: येथील लालपुलिया परिरसरात ट्रकमधील टाकीतून डिझेल चोरताना एकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात ...

डिझेल चोरी करणाऱ्याला रंगेहाथ पकडले

वणी: येथील लालपुलिया परिरसरात ट्रकमधील टाकीतून डिझेल चोरताना एकाला रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. उत्तराकुमार बरतीया ठाकूर असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बेनेतरा येथील रहिवासी आहे. राजकुमार सुरेश जयस्वाल यांनी त्याला ट्रकमधून डिझेल चोरताना रंगेहात अटक केली.

विचित्र अपघात तीन किरकोळ जखमी

वणी : वणी-घुग्गूस मार्गावरील लालगुडा गावाजवळ तीन वाहनांचा एकाचवेळी विचित्र अपघात झाला. त्यात तीनजण किरकोळ जखमी झाले तर तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

कोळसा खाली करून वणीकडे भरधाव येत असलेल्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने अगोदर घुग्गुसवरून वणीकडे येणाऱ्या एमएच ३४ बीआर ८६८८ क्रमांकाच्या कारला धडक देत रोडचे दुभाजक पार करून वणीवरून उकणीला जात असलेल्या एमएच ४० वाय ८१६३ या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमध्ये बसलेल्यांना दुखापत झाली नसली तरी कारचे मात्र मोठे नुकसान झाले. कारला धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने राज्य महामार्गावरील दुभाजक पार करून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाला धडक देत पिकअप वाहनासह ट्रकही रोडच्या खाली उतरला. हे पिकअप वाहन उकणीला जात होते. पिकअपचेही मोठे नुकसान झाले असून पिकअपमधील तीनजण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास वणी पोलीस करत आहेत.

साथीचे आजार रोखण्यासाठी फवारणीची मागणी.

मारेगाव : अर्धा अधिक पावसाळा संपत आला असून गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने आजार वाढत आहेत. असे असताना शहरासह ग्रामीण भागात अस्वच्छता आहे. घरी शौचालय असताना तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातसुद्धा नागरिक उघड्यावरच शौचासाठी जात आहेत. या अस्वच्छतेमुळे आजाराला आमंत्रण मिळत आहे.त्यामुळे जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टराची चलती

मारेगांव : येथील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने तालुक्यात एकमेव असलेले हे रुग्णालय सलाईनवर आहे. रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला बहुतांशवेळी रेफर केल्या जाते. त्यामुळे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचा नेमका फायदा तालुक्यात बोगस डॉक्टरांनी उचलला असून तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात या बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. रुग्णांवर अघोरी उपचार होत असल्याने अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.