शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात मंगळवारी पुरस्कार वितरण सोहळा

By admin | Updated: November 23, 2015 02:13 IST

गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा...

शरश्र्चंद्र टोंगो राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धा यवतमाळ : गत पिढीतील ख्यातनाम मराठी कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोकमतने आयोजित केलेल्या राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृहात होत आहे. या सोहळ्याला महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग, इतिहास तज्ज्ञ अरुण हळबे उपस्थित राहणार आहे. कथा लेखक, पत्रकार, कै.प्रा. शरश्र्चंद्र टोंगो हे यवतमाळचे भूषण मानले गेलेले व मराठी कथा विश्वाला एक वेगळे व आकर्षक वेगळे वळण देणारे कथा लेखक होते. खांडेकर, फडके व माडगुळकरांसारखे ज्येष्ठ कथा लेखक ज्या काळात लिहित होते. त्या काळात आपल्या कथेचा आगळा ठसा उमटविण्याचा मान कै.प्रा. टोंगो यांच्याकडे जातो. त्यांनी लोकमतच्या आरंभ काळात त्यात लेखन केले व त्याचा वाङ्मयीन दर्जा उंचावला. त्यांच्या लिखाणाने लोकमत एवढेच मराठी साहित्यही प्रगल्भ झाले. विदर्भ आणि महाराष्ट्रात त्यांचे साहित्य क्षेत्रात नाव आदराने घेतले जाते. बाल साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविला होता. लोकमतच्यावतीने आयोजित राष्ट्रीयस्तर कथा स्पर्धेत मराठीतील ५०० हून अधिक लेखक व लेखिकांनी भाग घेतला. या सहभागात तामिळनाडूपासून महाराष्ट्रपर्यंतचे अनेक नवे व जुने लेखक एकत्र आले. या कथामधून पुरस्कारासाठी कथांची निवड करणे अवघड व्हावे एवढ्या या सगळ्या कथा दमदार व चांगल्या होत्या. लोकमत नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार आणि ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांनी हे जिकरीचे काम हसतमुखाने व लोकमतविषयीच्या आस्थेने पूर्ण केले.या सोहळ्याला लोकमत, कै.प्रा. टोंगो यांच्या विस्तृत परिवारातील साऱ्यांनी अगत्याने उपस्थित रहावे, अशी विनंती लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले आहे. (उपक्रम प्रतिनिधी)