शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या अस्थी शिरवताना तरुण मुलास जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:26 IST

आईच्या अस्थी शिरविताना पाण्यात बुडून आसेगाव(देवी) येथील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देगजाला पँट अडकला : आसेगावदेवीत शोककळा

आॅनलाईन लोकमतआसेगाव(देवी) : आईच्या अस्थी शिरविताना पाण्यात बुडून आसेगाव(देवी) येथील तरुण मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. कौंडण्यपूर येथे हा प्रकार घडला. श्याम वामनराव येऊतकर (२६) असे मृताचे नाव आहे.श्यामची आई लीलाबाई यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले. शुक्रवारी त्यांचा दहावा दिवस करण्याचे निश्चित झाले. यासाठी अस्थी घेऊन शुक्रवारी आप्त मंडळी कौंडण्यपूर (ता.तिवसा, जि.अमरावती) येथे गेली. अस्थी विसर्जन करून सोबतच्या लोकांनी आंघोळीसाठी पाण्यात उडी घेतली. यात श्यामचाही समावेश होता. तो थोडा खोल पाण्यात गेला. त्याठिकाणी त्याचा पँट गजाला अडकला. बाहेर पडता येत नसल्याने त्याने मदतीसाठी धावा केला. मात्र खोल पाणी असल्याने मदत मिळाली नाही. एका नावचालकाने (डोंगा) पाण्यात उडी घेतली. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.पोलिसांची कारवाई पूर्ण होऊन त्याच्या पार्थिवावर अमरावती येथील शासकीय रुग्णालयात शवचिकित्सा करण्यात आली. रात्री ९.३० वाजता शोकाकूल वातावरणात श्यामवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे उज्ज्वल, अमोल, रवी हे तीन भाऊ व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली.