सवना : पपई खाण्यासाठी शेतात गेलेल्या एका तरुणाचा तुटलेल्या जीवंत वीज तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कलगाव ते सवना मार्गावरील शेतात बुधवारी दुपारी २ वाजता घडली. अफरोज ऊर्फ अरबाज खान अजगर खान पठाण (१६) रा. कलगाव ता. महागाव असे मृताचे नाव आहे. तो बुधवारी दुपारी २ वाजता सवना मार्गावरील भगवान बांते यांच्या पपईच्या बगीच्यात पपई खाण्यासाठी गेला. दरम्यान, शेतात तुटून पडलेल्या एका वीज ताराचा त्याला स्पर्श झाला. विजेच्या जबर धक्क्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या मागे दोन बहिणी, आई-वडील असा परिवार आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
तुटलेल्या वीज ताराच्या स्पर्शाने तरुण ठार
By admin | Updated: August 6, 2015 00:00 IST