लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती विशद करणारी यासारखी भीमगीते रविवारी सादर करण्यात आली. समतापर्वाच्या वतीने आयोजित निळी पहाट या संगीत मैफलीत ही भीमगीते सादर झाली. स्थानिक गायकांनी गायिलेल्या या भीमगीतांमुळे यवतमाळकर मंत्रमुग्ध झाले.यवतमाळातील स्पंदन गृपने सादर केलेल्या या भीमगीतांना स्थानिक कलावंतांनी वाद्याची साथ दिली. भल्या पहाटेपासूनच भीमगीत गायिले गेले. कोण सकाळी पूर्व दिशेला स्वरांजली वाहिते, अमृतवाणी ही बुद्धाची ऐकून घ्या ध्यानी, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं यासारखे असंख्य भीमगीत या ठिकाणी गायिल्या गेले. यामुळे निळी पहाट कार्यक्रमात यवतमाळकर तल्लीन झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. ही भीमगीते नवचैतन्य पसरवित होती. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.घनशाम पाटील, घनशाम कांबळे, सीमा खान या गायकांनी २० गिते यावेळी सादर केली. प्रकाश कुमरे, नौशाद खान, पवन भारस्कर यांनी वाद्यांच्या मदतीने साथ दिली. तर साहील दरणे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. समतापर्वाचे अध्यक्ष निरज वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 21:50 IST
‘ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती विशद करणारी यासारखी भीमगीते रविवारी सादर करण्यात आली. समतापर्वाच्या वतीने आयोजित निळी पहाट या संगीत मैफलीत ही भीमगीते सादर झाली. स्थानिक गायकांनी गायिलेल्या या भीमगीतांमुळे यवतमाळकर मंत्रमुग्ध झाले.
ज्ञानसूर्य तू इस जगत का भीमराव महान
ठळक मुद्देनिळी पहाट : भीमगीतांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली, समता पर्वचे आयोजन