शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकाराच्या उमरखेड येथील प्रतिष्ठानावर धाड

By admin | Updated: September 16, 2015 03:06 IST

गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा उमरखेड परिसरात अवैध सावकारीला उधाण आले आहे.

शेतकऱ्याची फसवणूक : सहायक निबंधकांची कारवाईउमरखेड : गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा उमरखेड परिसरात अवैध सावकारीला उधाण आले आहे. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी दुपारच्या सुमारास येथील सराफा लाईन परिसरातील वर्मा ज्वेलर्स नामक अवैध सावकाराच्या प्रतिष्ठांनावर सहकार विभागाने पोलीस बंदोबस्तात अचानक धाड मारली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून, अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उमरखेड येथील सुभाष कदम यांच्या लेखी तक्रारीवरून ही कारवाई सहायक निबंधक उमरखेड कार्यालयाने केली. अवैध सावकारीबाबत दीपक राधेशाम वर्मा, गोपाल माणिकचंद वर्मा, चंदू राजाराम वर्मा यांच्या मालकीच्या शहरातील सराफा लाईनमधील वर्मा ज्वेलर्स या दुकानावर धाड टाकण्यात आली. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. मालमत्तेसंबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली. तक्रारकर्र्ते सुभाष राजाराम कदम यांना मरसूळ गावातील दादाराव बेडके यांची शेती विकत घ्यावयाची होती. त्यासाठी त्यांना काही पैसे कमी पडत होते. या पैशाची पूर्तता करण्यासाठी वर्मा ज्वेलर्स या प्रतिष्ठानमध्ये सोने विक्री करण्यासाठी सुभाष कदम गेले होते. यावेळी सोने विकत न घेता गहाण ठेऊन तुला मी पैसे देतो आणि काही पैसे कमी पडत असल्यास ते देखील देतो. परंतु ती शेती माझ्या नावावर कर, पैसे परत दिल्यानंतर शेती तुझ्या नावे करतो अशा प्रकारचे आमीष दीपक राधेशाम वर्मा यांनी कदम यांना दाखवून शेती स्वत:च्या नावे करून घेतली. दरम्यान सुभाष कदम यांनी आटापिटा करून वर्मा यांचे संपूर्ण नऊ लाख रुपये परत केले. परंतु वर्मा यांनी कदम यांना नऊ लाख रुपये हे व्याजच होते, मुळ रक्कम तुझ्याकडे अद्यापही कायम असल्याचे म्हटले. त्यामुळे आता तू १० लाख रुपये एकर प्रमाणे पाच एकरचे ५० लाख रुपये दिल्यासच शेती तुझ्या नावे करतो असे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सुभाष कदम यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी सविस्तर तक्रार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केली. या तक्रारीची दखल उमरखेड येथील सहाय्यक निबंधक सुनील भालेराव, आर्णीचे सहाय्यक निबंधक माधव अबीलव, सहकार अधिकारी ए.डी. भागानवरे, ओ.एम. वदुरकर, एस.एस. पिपरखेडे, एस.एस. थोरात, एस.एम. कंठ, कृषी बाजार समितीचे निरिक्षक अ.द. जगताप, यु.जी. काळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज मानकर यांनी वर्मा ज्वेलर्सवर धाड मारली. या धाडीत वर्मा कुटुंबियांच्या नावे असलेल्या नांदेड, हदगाव, उमरखेड व इतर ठिकाणच्या मालमत्तेचे दस्ताऐवज जप्त करण्यात आले. वर्मा कुटुंबीयांकडून इतर शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही. त्यानुषंगानेही सहकार विभागाकडून तपास सुरू आहे. सहकार विभागाकडून उमरखेड शहरात प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आल्याने अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. तालुक्यात व शहरात अवैध सावकारी करणारे असतील तर त्यासंदर्भात लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था उमरखेड यांच्याकडे करण्याचे आवाहन सुनील भालेराव यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)