लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.पांढरकवडा शहराच्या दर्शनी भागाातूनच वाराणसी ते कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग जात असून शहरात प्रवेश करायचा झाल्यास याच मार्गावरून जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग आणि पांढरकवडा शहराकडे जाणारा मार्ग मिळून या रस्त्याला इंग्रजी अक्षर वाचा आकार आल्यामुळे या पॉइंटला वाय पॉइंट हे नाव पडले. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाने रात्रंदिवस भरधाव वाहने धावतात. या रस्त्यावरून पांढरकवडा शहरात प्रवेश करताना दोन्हीही बाजुंनी सारखी वाहनांची वर्दळ सुरू असते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.या स्थळावर सतत लहान मोठे अपघात होतात. वाहनांचा वेग मंदावण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुला गतीरोधक बसविण्यात आले होते. या गतीरोधकामुळे वाहनांचा वेग काही प्रमाणात कमी होत होता. परंतु आता गतीरोधकही काढण्यात आले. परिणामी वाहनांचा वेग वाढला असून रात्रंदिवस महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी भरधाव वाहने चालतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पांढरकवडा वाय पॉर्इंट धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:32 IST
येथील वाय पॉइंटवर सतत लहान-मोठे अपघात होत असून हा पॉर्इंट अत्यंत धोकादायक झाला आहे. नेहमीच भरधाव वाहने जाणाऱ्या वाय पॉइंटवरील रस्त्यावर असलेले गतीरोधकही काढण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
पांढरकवडा वाय पॉर्इंट धोकादायक
ठळक मुद्देगतीरोधकही काढले : उड्डाणपूल तयार करण्याची मागणी