यवतमाळ : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचे वर्ष उष्णतेच्या लाटेचे असेल. यामुळे उष्माघाताच्या बळीची संख्या वाढण्याचा धोका आहे. यावर मात करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुहास दिवसे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि नगरपालिकांना तातडीचे पत्र लिहिले. या पत्रातील सूचनांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने १७ उपाययोजना सुचविल्या आहेत. (शहर वार्ताहर)
यंदाचे वर्ष उष्माघाताचे
By admin | Updated: March 6, 2017 01:20 IST