शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कपाशीचा पेरा घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:09 IST

दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही.

ठळक मुद्देशेतकरी उदासीन : बियाणे कंपन्यांचा पत्ताच नाही, बोंडअळीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : दरवर्षी मे-जून महिन्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असतो. मात्र गेल्या वर्षी बोंडअळीने कहर केल्याने यावर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच बियाणे कंपन्यांनीही जाहिरातीचा धुमधडाका सुरू केला नाही.उन्हाळ्यात कपाशी बियाणे कंपन्यांचा जाहिरातबाजीवर भर असतो. गावोगावी कंपन्यांची वाहने बियाण्यांचा प्रचार करतात. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे आमिष दाखवून बियाण्यांची विक्री करतात. आपलेच बियाणे कसे सरस आहे, याबाबत सर्वच कंपन्या दावा करतात. प्रचारासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. अनेक ठिकाणी मोठमोठ्ठे बॅनर, र्होर्डिंग्ज लावले जातात. अनेक शेतकरी जाहिरातीला भुलून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र गेल्या वर्षी याच बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसारच उद्ध्वस्त झाले. त्यामुळे यावर्षी बियाणे कंपन्यांचा प्रचाराचा धुमधडाका कुठेही दिसून येत नाही.गेल्या वर्षी बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागले. बियाणे कंपन्यांवर संताप व्यक्त केला. शासनाने नुकसानभरपाईसाठी बियाणे कंपन्यांकडे बोट दाखविले. यामुळे यावर्षी सर्वच बियाणे कंपन्या धास्तावल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांच्या प्रचारावर मरगळ आली आहे. बियाणे प्रचारासाठी ग्रामीण भागात गेल्यास मोठा अनर्थ घडण्याची धास्ती कंपन्यांच्या प्रतिनिधींना वाटत आहे. यामुळे यावर्षी शहरासह ग्रामीण भागात कुठेही बियाणे कंपन्यांची वाहने प्रचार करताना दिसत नाही. दुसरीकडे शेतकरीही उदासीन आहे. अद्याप अनेकांनी बियाणे खरेदी केली नाही. तथापि येत्या काही दिवसात बियाणे खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.सोयाबीनचा पेरा वाढणारगेल्यावर्षी कपाशीने दगा दिल्याने यावर्षी कपाशीचा पेरा घटणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली. यामुळे तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीचा नाद सोडून दिला आहे. नगदी पीक म्हणून आता सोयाबीनला प्राधान्य दिले जात आहे.

टॅग्स :cottonकापूस