शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कमी पटाच्या शाळांवर गंडातर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:34 IST

गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देशिक्षण समितीत चर्चा : विद्यार्थ्यांचे होणार समायोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या तीन वर्षांपासून टळत चाललेले ‘शाळा बंद’चे संकट यंदा अटळ आहे. जिल्ह्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत चर्चा झाली असून येत्या दोन दिवसात शाळांच्या संख्येवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.२० पेक्षा कमी पट असताना संचमान्यतेनुसार शिक्षकाची नेमणूकच करता येत नाही. तरी जिल्ह्यात अशा अनेक शाळांमध्ये शिक्षक कार्यरत आहेत. तर अनेक दुर्गम गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यातूनच तीन वर्षांपूर्वी कमी पटाच्या शाळा बंद करण्याचे फर्मान जिल्हा परिषदेत धडकले होते. आता २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून २० नाही पण १० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षण समितीत याबाबत अनौपचारिक चर्चाही झाली. कमी पटाच्या शाळांची आकडेवारी गोळा करणे, त्या भागातील दुसऱ्या शाळेची स्थिती तपासणे आदींबाबत सध्या विचार सुरू आहे. येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारीसह याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.१०० शाळा घटणारजिल्हा परिषदेच्या २ हजारांपेक्षा अधिक शाळा आहेत. यातील कमी पटाच्या शाळांची मोजदाद अंतिम टप्प्यात आहे. त्यानुसार, सुमारे १०० शाळांचे इतरत्र समायोजन केले जाण्याची शक्यता शिक्षण समितीच्या एका सदस्याने वर्तविली. अशा शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातीलच अनुदानित संस्थेच्या शाळेत समायोजित केले जाणार आहे. तर शिक्षकांना जिल्हा परिषदेच्याच इतर शाळेत बदली दिली जाणार आहे.