शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या साक्षी व सुषमाला ‘लोकमत’चा सखी सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 22:04 IST

गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देअमरावतीत शानदार सोहळा । वेटलिफ्टर आणि एव्हरेस्टवीर युवतींचा गुणगौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुणवत्ता पूर्ण कार्यातून कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘लोकमत’च्या सखी सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यात यवतमाळ जिल्ह्यातील साक्षी मस्के आणि सुषमा मोरे या दोन युवतींचा सन्मान करण्यात आला. बुधवारी अमरावती येथील अभियंता भवनात हा शानदार सोहळा पार पडला.लोकमत सखी मंच व आयआयडीएस यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते. लोकमतचे संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. मेळघाटात अतुलनीय कार्य करणाºया पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावेळी कमलताई गवई यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील (पुसद) साक्षी प्रकाशराव मस्के हिला सन्मानित करण्यात आले. साक्षीने आफ्रिका (सामोआ देश) येथे झालेल्या कॉमनवेल्थ ज्युनिअर वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. शिवाय राष्ट्रीय स्तरावर दोन सुवर्ण पदके तर राज्य स्तरावर एक सुवर्ण पदक पटकाविले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.तसेच शौर्य या वर्गवारीतून सखी सन्मान पुरस्कारासाठीही यवतमाळ जिल्ह्यातील सुषमा मोरे या युवतीची निवड करण्यात आली होती. सुषमा मोरे ही कळंब तालुक्यातील शिवपुरी गावाची रहिवासी आहे. या युवतीने महाराष्ट्र शासनाच्या मिशन शौर्य मोहिमेअंतर्गत जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले. ती सध्या कीटा कापरा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ११ व्या वर्गात शिकत आहे. तिच्या धाडसाचे कौतुक म्हणून ‘लोकमत’च्यावतीने तिला सखी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.साक्षी आणि सुषमा या दोघीही यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. आपापल्या क्षेत्रात सातत्याने केलेले परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी यश मिळविले आहे. सामान्य कुटुंबात असलेल्या या दोघींनीही मिळविलेल्या यशाने यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.