शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

यवतमाळची स्मशानभूमी हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:38 IST

शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाºया शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : मोबाईलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत. त्यानंतरही अतिशय जिव्हाळ््याच्या व तितक्याच वेदनादायी अंत्यविधीसाठी नगरपरिषदेने कोणतीच सुविधा दिली नाही.अत्यंविधीला प्रत्येक धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तो चांगल्या व स्वच्छ वातावरणातच पार पडला जावा, जेणे करून मृताच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, अशी सर्वमान्य धारणा आहे. माणसाचा देह पंचतत्वात विलीन होण्याची क्रिया म्हणजे दहन अथवा दफन क्रिया होय. यवतमाळकरांच्या दुर्दैवाने या क्रियेलाच येथे ग्रहण लागले आहे. शहरातील एकमेव हिंदू दफनभूमीच नामशेष झाली आहे. पाढंरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीतच दफनभूमी आहे. येथील दहन क्रियेचा परिसर थोडाबहुत सुस्थितीत असून इतरत्र पाय ठेवायलाही जागा नाही. वर्चस्वाच्या आणि श्रेयाच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे सुरू आहे. पालिकेत काही केवळ स्वत:चे हित कसे जोपासता येईल इतकाच संकूचित विचार करत आहे. कंत्राट कोणतेही असो पूर्वीचा टक्केवारीचा निकष बाजूला पडला आहे. आता भागीदारीमध्ये (जॉर्इंट व्हेंचर) कामे दिली जात आहे. याचे घोर परिणाम यवतमाळकरांना सोसावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांच्या चढाओढीत प्रशासन मौजेत असून शहरातील समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही.पांढरकवडा मार्गावरच्या दफनभूमीकडेही यातूनच दुर्लक्ष झाले आहे. कधीकाळी ही स्मशानभूमी शहराचे वैभव होती. येथील स्वच्छता व सोयी सुविधांचे नियोजन पाहाण्यासाठी इतर नगरपरिषदांच्या चमू भेट देत होत्या. आता परिस्थती पूर्णत: बदलली आहे. हिंदू दफनभूमी घनदाट झाडाझुडपात हरविली आहे. रात्री येथे दिवाबत्तीची कोणतीच सोय नाही. अक्षरश: मोबाईलचा टॉर्च लावून विधी उरकावा लागत आहे. दफन करण्यासाठी येथे इंचभरही जागा शिल्लक नाही. कधीतरी या परिसराची सफाई झाली होती. त्यानंतर येथे कोणीच फिरकले नाही. विशेष म्हणजे, लहान-थोरांच्या अंत्यविधीसाठी नगरसेवकांची, अधिकाºयांची येथे वर्दळ असते. तरीही येथील समस्यांवर दुर्लक्ष आहे.सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष शिवसेनेच्या आहेत. त्यांची विकासकामात आडकाठी येते ही आवई उठविल्या जाते. ही अडचणही राज्य शासनाने दूर केली असून नगराध्यक्षाला नामधारीच ठेवले आहे. त्यानंतरही निवडणूक काळात शहरवासीयांना दिलेल्या एकाही आश्वासनाची भाजपाने पूर्तता केली नाही. २४ तास स्वच्छ पाणी, गुळगुळीत रस्ते, देखणी उद्याने, घरकूल, स्वच्छ सुदंर परिसर हे सर्व दिवास्वप्नच ठरले आहे. उलट नगरपरिषदेची कार्यान्वित असलेली यंत्रण ठप्प झाली. मुलभूत सोयी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. अपवाद सोडता घंटागाड्या बंद आहेत. पोकळ घोषणांचा समाचार घेण्यात विरोधकही कमी पडत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ