शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

यवतमाळला मोठी परंपरा

By admin | Updated: September 21, 2015 02:25 IST

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेला बळी ठरण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन विशेषविज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेला बळी ठरण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत. आदिवासी पाड्यापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धा पहावयास मिळते. यवतमाळ जिल्ह्याला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची मोठी परंपरा आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक श्याम मानव यवतमाळ जिल्ह्याचेच. त्यांच्याच प्रेरणेतून यवतमाळात मोठी चळवळ उभी राहिली. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर अंकुश ठेवला. या चळवळीत ज्यांनी वाहून घेतले त्यांनी कशाचीही तमा न बाळगता लोकांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रूजविण्याचा प्रयत्न केला. समाजात रुढी, परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्या आहे. या रुढी परंपरातूनच अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते. अनेकदा भीतीतूनही अंधश्रद्धा फोफावत जाते. शहरी आणि ग्रामीण भागात अंधश्रद्धेच्या प्रकारात फरक दिसत असला तरी मानसिकता मात्र एकच असते. सुशिक्षित आणि अशिक्षितही अंधश्रद्धेत आकंठ बुडालेले दिसून येतात. अंधश्रद्धेतून अनेकदा जीवघेणे आणि अघोरी प्रकारही घडतात. या सर्वांना पायबंद घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोमाने कार्य करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धेतून बळी गेल्याच्या काही घटना आहे. दोन वर्षापूर्वी घाटंजी तालुक्यातील चोरंबा या गावी सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा नरबळी देण्याची घटना उघडकीस आली. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्हाच नव्हे राज्य हादरुन गेले होते. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अनेक घटना दैनंदिन घडत असतात. एकीकडे विज्ञान वादाचा पुरस्कार करायचा आणि दुसरीकडे अंधश्रद्धेला खतपाणी घालायचे असा प्रकारही नवीन नाही. कर्मयोगी गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून आयुष्यभर अंधश्रद्धेवर घणाघाती प्रहार केले. त्यांचे अनेक कीर्तने यवतमाळ जिल्ह्यात झाली. त्यातून अंधश्रद्धा निर्मूलनास मदतच झाली. शाम मानव यांच्या रुपाने देशाला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा खंदा पाईक या जिल्ह्याने दिला. त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील अनेक प्रकरणांचा भंडाफोड केला. आजही या चळवळीत काम करणारी मंडळी बाबा बुवांचा भंडाफोड करण्यास मागेपुढे पाहत नाही. पुरोगामी महाराष्ट्राने जादुटोणा विरोधी कायदा केला. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी म्हणून यवतमाळात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पोलीस ठाण्याशी संबंधित कायदे असल्याने पोलिसांसाठीही विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरित यवतमाळ जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत आघाडीवर आहे.