शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळकरांना ग्रामविकासाचे धडे

By admin | Updated: July 12, 2014 01:51 IST

किडलेले दात स्वच्छ करणारा एक तरूण डॉक्टर ग्रामविकासाच्या कल्पनेने झपाटून जातो. रात्रंदिन त्याला गाव स्वच्छ करण्याचा ध्यास. असे करीत असतांना त्याला ...

यवतमाळ : किडलेले दात स्वच्छ करणारा एक तरूण डॉक्टर ग्रामविकासाच्या कल्पनेने झपाटून जातो. रात्रंदिन त्याला गाव स्वच्छ करण्याचा ध्यास. असे करीत असतांना त्याला प्रचंड विरोधही होतो. मात्र शांत स्वभावाचा हा तरूण मात्र काही दिवसांनी ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत होतो. गावे जेव्हा राष्ट्रीय पातळीवर चमकतात तेव्हा गांवकरी मात्र हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यालाच पाठवितात. या माणसाचे नांव आहे डॉ. अविनाश पोळ.डॉ.अविनाश पोळ रविवार १३ जुलैला यवतमाळात येत आहे. प्रयास-सेवांकूर यवतमाळच्यावतीने महेश भवनात सायंकाळी ७ वाजता आयोजित व्याख्यानातून ते शहरवासीयांना ग्रामविकासाचे धडे देणार आहेत. सध्या राज्यामध्ये ‘पाणीबाणी’ सुरू आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयाच्या योजना असूनही जलसंधारणाला पाहिजे तशी गती मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे अविनाश पोळ यांचे व्याख्यान दिशादर्शक ठरणार आहे.शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी व्यावहारिक शिक्षणाचेही धडे घेतले. श्रमाचा संस्कार त्यांच्यावर झाला होता. ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाने त्यांचे अख्खे जीवनच पालटले. डॉक्टरकीचा पेशा करीत असताना त्यांच्या मनात ग्रामीण विकासाची तळमळ सुरू झाली. ग्रामीण भागातील अनारोग्याचे मूळ दुखणे त्यांच्या लक्षात आले. रस्ते, शौचालय, गटारे, पाणी, अंगणवाडी, व्यायामशाळा, समाजमंदिर आदी बाबींसाठी त्यांनी ग्रामीण भागात काम सुरू केले. लेबलेवाडी, शिवथर, आसगाव, दरे बु., आदी गावांना ग्रामीण विकासामध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. रोहयोवर काम करीत श्रमदान ही त्यांची संकल्पना देशपातळीवर महत्वपूर्ण ठरली. कृषी, वन, पर्यावरण आदी क्षेत्रात गावाला त्यांनी मजबूत केले. मापरवाडी नावाचे टंचाईग्रस्त गाव आज पाण्याने समृद्ध झाले आहे. सातारा जिल्ह्यातून सुरू झालेली ग्रामविकासाची ही चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. एनजीओच्या बदनाम अर्थकारणापासून स्वत:ला अलिप्त ठेवलेल्या या माणसाने अनेक गावांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. त्यांच्या या कार्याची दखल विविध संस्थांनी घेतलेली आहे. त्यांच्या ज्ञानाचा यवतमाळकरांना फायदा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)