शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात घनकचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:01 IST

शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे.

ठळक मुद्देडम्पिंगचा प्रश्न कायम : नगरसेवकाचा इशारा, कचरा टाकण्यासाठी जागाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील घनकचरा संकलनाची यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाली आहे. मात्र आता कचरा डम्पिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संकलित कचरा कुठे जमा करावा, यासाठी हक्काची जागा पालिकेकडे नाही. परिणामी घंटागाड्यांची यंत्रणा अनेक प्रभागात ठप्प झाली आहे. शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तत्काळ व्यवस्था करण्याचा इशारा दिला आहे.नगरपरिषदेजवळ सावरगड कचरा डेपो व धामणगाव बायपासवरील डम्पिंग यार्ड या दोन जागा हक्काच्या आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. सावरगड कचरा डेपोत अनेक दिवसांपासून परंपरागत पद्धतीने कचरा साठविला जातो. यामुळे लगतच्या गावात दुर्गंधी येते व रोगराई पसरण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मुळात दैनंदिन कचºयाचे विलगीकरण करून त्यातील विघटनशील कचºयावर प्रक्रिया करून त्यापासून गांढूळ खत निर्मिती अथवा कंपोस्ट तयार होऊ शकते. पूर्वी असा प्रकल्प सावरगड कचरा डेपोत कार्यान्वित होता. मात्र नंतर याकडे दुर्लक्ष करत आलेला कचरा मनमानी पद्धतीने टाकण्यात येत होता. त्यातही वाहन दूर न नेताच अगदी जवळ कचरा टाकून वाहने निघून जात होती. परिणामी विस्तीर्ण परिसर असूनही काही वर्षातच सावरगड कचरा डेपो आता डम्प करण्यायोग्य राहिलेला नाही. सुरुवातीला नगरपरिषदेकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आश्वासन सावरगड ग्रामस्थांना देण्यात आले होते.काही दिवस येथे नियमित फवारणी व ट्रायकोडर्मासारख्या विघटकाचा वापरही होत होता. नंतर भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याने निधी हडपून थेट कचरा टाकला जात आहे. यामुळेच हा कचरा डेपो ग्रामस्थांनी बंद करण्यासाठी उग्ररूप धारण केले आहे. त्यानंतर पर्यायी जागा म्हणून धामणगाव बायपासवरील शेताची निवड केली. हे शेतसुद्धा नागरी वसाहतीला लागून आहे. येथे कचºयावर प्रक्रिया करण्याची कोणतीच प्रक्रिया नाही. मृत जनावरेसुद्धा बेमुरवतपणे फेकून दिले जातात. बºयाचदा उन्हाळ्याच्या दिवसात प्लास्टीक पन्न्या जाळण्यात येतात. यातून विषारी धूर बाहेर निघतो. आता चिखलामुळे या भागात घंटागाड्या घेऊन जाता येत नाही. त्यामुळे येथील कचरा डम्पिंग बंद आहे. कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण पुढे करून घंटागाड्या प्रभागात येणे बंद केले आहे.या गंभीर प्रकारात तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले यांनी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे.

टॅग्स :dumpingकचरा