शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal: अर्धवेळ नोकरीच्या नादात तरुणाने गमावले ११ लाख रुपये, टास्क देत ओढले ट्रेडिंगच्या जाळ्यात 

By सुरेंद्र राऊत | Updated: August 17, 2023 21:03 IST

Yavatmal Crime News: कोरोना काळापासून घरी बसून कंपनीत काम करणाऱ्या युवकाला व्हॉटस्ॲपवर आलेला मेसेज पडताळून त्याला रिप्लाय करणे चांगलेच महागात पडले.

- सुरेंद्र राऊत पुसद -  कोरोना काळापासून घरी बसून कंपनीत काम करणाऱ्या युवकाला व्हॉटस्ॲपवर आलेला मेसेज पडताळून त्याला रिप्लाय करणे चांगलेच महागात पडले. सुरुवातीला टास्कच्या मोबदल्यात रोख पैसे मिळतील, ही अर्धवेळ नोकरी राहील, असे सांगत वेळोवेळी परतावा देत युवकाला ट्रेडिंग व क्वॉईनच्या जाळ्यात ओढले. नंतर त्याच्याकडूनच वेगवेगळ्या बहाण्याने पैसे वसूल केले. १० लाख ८५ हजारांची रोख गमावल्यानंतर त्या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

नेहाल साहेबराव वराडे रा. मोतीनगर पुसद असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. नेहाल कोरोना काळापासून घरूनच आपल्या कंपनीत काम करीत होता. त्याला इंटरनेटवर असतानाच १६ जून रोजी व्हॉटस्ॲप मेसेज आला. तो संदेश त्याने पाहिला असता तो राधिका शर्मा नामक मुलीचा असल्याचे आढळले. त्याने तिच्यासोबत बोलचाल केली. तिने अर्धवेळ नोकरीचा प्रस्ताव ठेवला. एकूण १८ टास्क पूर्ण करण्यास सांगितले. प्रत्येकवेळी टप्प्याटप्प्याने याचा मोबदला दिला जाईल, असेही सांगितले. नेहालकडून याच बहाण्याने त्याचे बॅंक डिटेल्स काढून घेतले. सुरुवातीला प्रत्येक टास्क पूर्ण केल्यानंतर रक्कम त्याच्या खात्यात जमा होवू लागली. यामुळे नेहालचा विश्वासही बसत गेला. नंतर त्याला ट्रेडिंग कंपनीच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ केल्याचे भासवत, त्याच्याकडून तेथेही टास्क करण्यात आले. परतावा कमी आणि त्याला पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. हळूहळू करीत नेहालने तब्बल १० लाख ८५ हजार विविध खात्यातून यामध्ये गुंतविले. अखेर कुठलाच प्रतिसाद मिळणे बंद झाल्यानंतर नेहालने फसवणूक झाल्याची तक्रार पुसद शहर ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञात दोघांविरुद्ध कलम ४२०, ३४ भादंविसह ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीYavatmalयवतमाळ