अकोला: बुलडाणा संघाने कालच्या १ बाद ६१ धावांवरू न आज दुसर्या दिवशी सर्वबाद १९३ धावा केल्या. यवतमाळ संघाची सामन्यावर सुरुवातीपासूनच मजबूत पकड असल्याने यवतमाळ संघाने पहिल्या डावाच्या आघाडीमुळे सामना जिंकला. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर विदर्भ क्रिकेट संघटनेंतर्गत यवतमाळ व बुलडाणा संघादरम्यान खैरागड चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील दोन दिवसीय सामना खेळला गेला. बुधवारी, बुलडाणा संघाने कालच्या १ बाद ६१ धावांवरू न खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये शुभम पाटील याने ५५, राजपाल भोसले याने ४९, निखिल भोसले याने ४८ धावा केल्या. बुलडाणाने दुसर्या डावात ९ षटकांत ५ बाद ११८ धावा केल्या. यवतमाळ संघाकडून आशिष राठी याने ४१ धावांत ६ बळी घेतले. गिरीधर हातमोडे याने ४६ धावांत ३ गडी बाद केले. दुसरा डाव खेळताना यवतमाळ संघाने ४४.४ षटकांत सर्वबाद १२१ धावा काढून आघाडी मिळविली. बुलडाणा संघाकडून रामेश्वर सोनुने व निखिल भोसले यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. विक्रांत गुळवे याने २ आणि शुभम पाटील व जुबेर शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवशी सामन्यात यवतमाळ संघाने ७२.२ षटकांत सर्वबाद २६१ धावा केल्या होत्या. सामन्यात पंच म्हणून अनिल एदलाबादकर, पवन हलवणे यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे याने गुणलेखन केले.
पहिल्या डावाच्या आघाडीने यवतमाळ विजयी
By admin | Updated: September 3, 2015 00:22 IST