लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी आज गुरुवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून दारव्हा रोड स्थित शासकीय गोदाम (स्ट्राँग रुम) येथे मतमोजणीला प्रारंभ होत आहे. भावना गवळी पाचव्यांदा निवडून येतात की, दिग्गज माणिकराव ठाकरे दिल्लीत एन्ट्री करतात याचा फैसला होणार आहे. भाजप बंडखोर पी.बी. आडे नेमके कुणाला नुकसानकारक ठरले हेसुद्धा मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.निवडणुकीचे अधिकृत निकाल हाती यायला रात्री १२ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच केंद्रावरील व्हीव्ही पॅटची मोजणी केली जाणार आहे. मात्र विजयाचे कौल आधीच स्पष्ट होतील. ११ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर दीड महिना उमेदवार, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व जनतेला यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचा निकाल लागण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर मतमोजणीचा दिवस उजाडला आहे. शिवसेनेच्या भावना गवळी व काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत झाली. मतदानाच्या टक्केवारीवरून कुणाला फायदा, कुणाला तोटा याचे गणित मांडले जात आहे. एक्झिट पोलमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला कौल मिळाल्याने उत्साहात असलेले भाजप-सेनेचे कार्यकर्ते विजयाच्या जल्लोषासाठी आतूर आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे. मतदानानंतर माणिकराव राज्याच्या व देशाच्या प्रचारात सक्रिय दिसले. तर भावनाताई आईच्या सुश्रृषेत व्यस्त होत्या. मात्र आता हे दोन्ही प्रमुख उमेदवार यवतमाळात परतले आहेत.
यवतमाळ-वाशिमच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:36 IST
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी आज गुरुवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून दारव्हा रोड स्थित शासकीय गोदाम (स्ट्राँग रुम) येथे मतमोजणीला प्रारंभ होत आहे. भावना गवळी पाचव्यांदा निवडून येतात की, दिग्गज माणिकराव ठाकरे दिल्लीत एन्ट्री करतात याचा फैसला होणार आहे.
यवतमाळ-वाशिमच्या खासदाराचा आज फैसला
ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणार । सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष