शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

शौचालय बांधकामात यवतमाळ विदर्भात अव्वल

By admin | Updated: April 4, 2016 05:30 IST

वैयक्तिक शौचालय बांधकामात यवतमाळ जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला असून राज्यात पाचव्या स्थानावर

यवतमाळ : वैयक्तिक शौचालय बांधकामात यवतमाळ जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला असून राज्यात पाचव्या स्थानावर आहे. या वर्षात ३५ हजार १६७ शौचालयाचे बांधकाम करून हागणदारीमुक्त अभियानात जिल्ह्याने मोलाची भर घातली आहे.यवतमाळ जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून त्यांना १२ हजार रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. आॅनलाईनवरील बेस लाईनच्या माहितीनुसार जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार २८९ कुटुंब आहे. त्यापैकी २ लाख २७ हजार २४३ कुटुंबाकडे शौचालय नाही तर २ लाख २५ हजार ४६ कुटुंबाकडे शौचालय असून त्याचा ते वापर करीत आहे. २०१५-१६ मध्ये जिल्ह्याने ३५ हजार १८१ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यात सर्वाधिक बांधकाम बाभूळगाव तालुक्यात ३ हजार १४५ शौचालयांचा समावेश आहे. आर्णी १८७८, दारव्हा २३०२, दिग्रस १९६०, घाटंजी २१४०, कळंब १७५०, केळापूर २१३२, महागाव २८३४, मारेगाव ११२६, नेर १३७०, पुसद २९२०, राळेगाव २३६०, उमरखेड २४७५, वणी १७९०, यवतमाळ २४४८ आणि झरी जामणी तालुक्यात २१९० शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनात विदर्भात यवतमाळ जिल्हा अव्वल ठरला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)बाभूळगाव पंचायत समिती हागणदारीमुक्तीच्या वाटेवर४हागणदारीमुक्त योजनेमध्ये बाभूळगाव तालुक्याचे काम अव्वल असून संपूर्ण बाभूळगाव पंचायत समिती हागणदारीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या तालुक्यात ३ हजार ५४५ शौचालय बांधण्यात आले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे बाभूळगाव पंचायत समितीला हे यश मिळाले.