शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

यवतमाळ पब्लिक स्कूल ‘चॅम्पियन’

By admin | Updated: November 23, 2014 23:28 IST

क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरलेले पोस्टल मैदान. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी क्रिकेटपटूंची खेळी. चौकार आणि षटकारांवर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या. डीजे, बँडच्या तालावर आणि फटाक्यांच्या

यवतमाळ : क्रिकेटप्रेमींच्या गर्दीने खचाखच भरलेले पोस्टल मैदान. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी क्रिकेटपटूंची खेळी. चौकार आणि षटकारांवर पडणाऱ्या प्रेक्षकांच्या टाळ्या. डीजे, बँडच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या अंतिम सामन्यात यवतमाळ पब्लिक स्कूलच्या संघाने ३१ धावांनी जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तेव्हा तर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती यवतमाळ पब्लिक स्कूलच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी यवतमाळ प्रिमीअर लिगचे आयोजन केले होते. येथील पोस्टल मैदानावर ९ नोव्हेंबरपासून या स्पर्धा रंगल्या. विविध १२ संघांनी चॅम्पियनसाठी प्रतिस्पर्धांना कडवी झुंज दिली. मात्र अंतिम सामन्यात पोहोचला तो यवतमाळ पब्लिक स्कूल आणि जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ. रविवारी दुपारी १२.३० वाजता पोस्टल मैदानावर या दोन संघात सुरू झाले क्रिकेटचे युद्ध. वायपीएस संघाने प्रथम फलंदाजी करीत १५ षटकात ५ बाद १०७ धावांचा डोंगर उभा केला. अथर्व तोडेने दमदार २४ तर देवांश मांगुळकरने सात चेंडूत आक्रमक १९ धावांचे योगदान दिले. प्रतिउत्तरादाखल जायंटस् संघ सुरुवातीपासून दबावात खेळताना दिसत होता. जायंटस् संघाने १०७ धावांचे आवाहन स्वीकारत फलंदाजीला सुरुवात केली. मात्र एकही खेळाडू अधिक वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आदित्यने १६ धावा काढल्या. या संघाने १३.३ षटकात ७६ धावा काढीत पराभव स्वीकारला. शशांक महाजनने भेदक गोलंदाजी करीत १४ धावात ५ गडी बाद करीत वायपीएसच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यानंतर विजेत्या यवतमाळ पब्लिक स्कूल संघाला २१ हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी तर उपविजेत्या जायंटस् इंग्लिश मीडियम स्कूल संघाला ११ हजार रुपये रोख व ट्रॉफी पद्मश्री दिलीप वेंगसरकर, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, नगराध्यक्ष सुभाष राय, स्पर्धेचे मुख्य संयोजक किशोर दर्डा यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वायपीएसचा शशांक महाजन तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्कूल आॅफ स्कॉलर्सचा पराग कुळकर्णी यांना पुरस्कृत करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)