शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

यवतमाळ प्रिमीअर लिग -२०१४

By admin | Updated: November 6, 2014 23:03 IST

शालेय विद्यार्थ्यांना आपले क्रीडा गुण सादर करता यावे, यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने विशेष पुढाकार घेत ‘यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४’ ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.

‘वायपीएस’चे क्रिकेटला प्रोत्साहन : स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांना आपले क्रीडा गुण सादर करता यावे, यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने विशेष पुढाकार घेत ‘यवतमाळ प्रिमीअर लिग - २०१४’ ही लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत येथील पोस्टल मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या सामन्याकरिता विविध आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहे. विजेत्या संघाला रोख २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्या संघाला ११ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास ५०० रुपये तर मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजांना तीन हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी ‘वायपीएस’ शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य अंग असल्याची बाब लक्षात घेत त्यांनी या सामन्यासाठी सर्वोपरी सहकार्य केले आहे. प्राचार्य जेकब दास यांचीही भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. त्यांचे या स्पर्धेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. स्पर्धेचे पंच म्हणून कुमार चौधरी, आशिष तोटे, हेमंत देवबंसी, गौरव शुक्ला, सचिन भोयर, रोहित रॉय हे काम पाहणार आहे. या सामन्याचे मुख्य समन्वयक यश बोरुंदिया, सहसमन्वयक प्रवीण कळसकर, अभिषेक गुजर आहेत. शालेय विद्यार्थ्यांमधील क्रिकेट खेळाबद्दलची रुची लक्षात घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयानेही स्पर्धेसाठी पोस्टल मैदान उपलब्ध करून दिले. याबद्दल आयोजकांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी माणिक विंगेट, विनायक गायकवाड, रमाकांत कौशिक, अजय गायकवाड, पराग पिंगळे, कुमार चौधरी, आशिष काळे, विवेक भोयर, अमोल चन्नूरवार, अमोल क्षीरसागर, उमेश कर्णेवार, उमाकांत रोडे, अभिजित भीष्म, शैलेंद्र चपेरिया, दिनेश जयस्वाल आदी पुढाकार घेत आहे. (वार्ताहर)