शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ नगरपालिकेच्या कम्पोस्ट खताला ब्रँड मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:20 IST

नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे.

तोट्यातील प्रकल्प : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी प्रमाणपत्र लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेचा सावरगड येथील कम्पोस्ट खतनिर्मिती प्रकल्प कधीच फायद्याचा ठरला नसला तरी आता येथील खताचे ब्रँडींग केले जाणार आहे. यवतमाळसह राज्यातील इतर पाच नगरपालिकांच्या कम्पोस्ट खताला ‘हरित कम्पोस्ट’ असा ब्रँड खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील वर्षा बंगल्यावर विशेष कार्यक्रम बुधवारी होत आहे. घनकचऱ्यातील ओला व सुका कचरा वेगळा करून सेंद्रीय खतनिर्मिती केली जाते. यवतमाळात भाजीपाला मार्केटमधून चार टन कचरा निघतो. याशिवाय इतर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी नगरपालिकेने वर्मी कम्पोस्टचे ६० बेड तयार केले आहे. कचरा विलगीकरणासाठी मोठी यंत्रणाही डेपोवर आहे. मात्र मागील काही वर्षापासून ही यंत्रणा बंद पडून आहे. उर्मी कम्पोस्टमध्ये खतनिर्मिती केली जाते. आता नगरपरिषदेकडे २० टन खत शिल्लक आहे. त्याची खुल्या बाजारात ४ रूपये प्रती किलोप्रमाणे विक्री केली जाते. मात्र नगरपरिषदेला या प्रकल्पातून कधीच आर्थिक फायदा झाला नाही. उलट खतनिर्मिती करणाऱ्या संस्थेलाच नगरपरिषदेकडून वर्षाकाठी १० ते १५ लाख रूपये दिले जातात. पालिकेच्या कम्पोस्ट खताचा अधिक प्रचार व्हावा यासाठी त्याला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून ब्रँड दिला जात आहे. राज्यातील विटाळा (सांगली) , पाचगणी (सातारा), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), सासवड (पुणे) व यवतमाळ या पाच नगरपरिषदांच्या कम्पोस्ट खताचे ब्रँडींग ‘हरित महाशेती कम्पोस्ट’ या नावाने केले जाणार आहे. त्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाच्या उपसचिवांकडून पत्र आले आहे.ग्रीन स्पेस डेव्हलपमेंटच्या ई-भूमिपूजनाचा सोपस्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता अमृत मिशन अंतर्गत ग्रिन स्पेस डेव्हलपमेंटचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे. पालिकेच्या सभागृहात मान्यवारांच्या उपस्थितीत ई-भूमिपूजनाचा सोपस्कार पूर्ण केला जाणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळात येऊन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन केले. दोन वर्ष लोटूनही या कामाची सुरूवातही झाली नाही. तेव्हा ई-भूमिपूजनाचे काय होईल, हा प्रश्न आहे.