शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

१५ किलोमीटर रस्त्यांच्या देखभालीचा भुर्दंड आता यवतमाळ नगरपरिषदेवर

By admin | Updated: April 13, 2017 00:50 IST

महामार्गावरील वाईनबार वाचविता यावे म्हणून यवतमाळातील मद्य सम्राटांकरिता नगरपरिषदेच्या पुढाकाराने शासनाने तडजोड केली.

मद्यसम्राटांसाठी तडजोड : प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे फलित, पालिका ठरावावर मात्र संशय यवतमाळ : महामार्गावरील वाईनबार वाचविता यावे म्हणून यवतमाळातील मद्य सम्राटांकरिता नगरपरिषदेच्या पुढाकाराने शासनाने तडजोड केली. त्यानुसार आता शहराबाहेर जाणारे नगरपरिषद हद्दीतील १५ किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा बोझा पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. बांधकाम खात्याच्या अंदाजानुसार, कोणत्याही प्रमुख मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रति किलोमीटर वार्षिक सरासरी खर्च १० लाख रुपये आहे. महामार्गावरील वाईनबार हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार यवतमाळ शहरातील सर्व प्रमुख बार बाद होणार होते. परंतु राजकीय इच्छाशक्तीने त्यातून पळवाट शोधली. त्यानुसार शहराबाहेर जाणारे सर्व प्रमुख मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आले. खुद्द नगरपरिषदेने त्यासाठी पुढाकार घेऊन स्वत:हूनच तसा प्रस्ताव बांधकाम खात्याला सादर केला. राजकीय दबाव असल्याने बांधकाम विभागानेही क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव अमरावती मार्गे मुंबईला पाठविला. अखेर त्या प्रस्तावाला ११ एप्रिल रोजी बांधकाम खात्याने मंजुरी दिली. त्यानुसार शहरातील सुमारे १५ किलोमीटरचे रस्ते हे यापुढे नगरपरिषदेच्या देखरेखीत राहणार आहेत. त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च नगरपरिषद करणार आहे. बायपास झाल्याने हे एकूण १५ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आता पालिकेच्या मालकीचे झाले आहे. त्यामुळे या मार्गांवरील वाईनबारला जीवदान मिळाले आहे. या रस्त्यावरील नगरपरिषद हद्दीबाहेरील वाईनबार व दारू विक्री केंद्रांना एक्साईजने सील लावले आहे. आर्णी रोडवर नगरपरिषद हद्दीबाहेर असलेल्या एका बारला राजकीय आशीर्वाद असल्याने मात्र या बारमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याची माहिती आहे. एकीकडे नगरपरिषदेच्या तिजोरीत विकास कामांसाठी निधी नाही तर दुसरीकडे १५ किलोमीटरचे हे रस्ते केवळ मद्यसम्राटांच्या सोईसाठी नगरपरिषदेने आपल्याकडे घेऊन खर्चाची नवी भानगड उभी केल्याचा काही सदस्यांचा सूर आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारीही आता नगरपरिषदेवर राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सदस्य म्हणतात, ठरावाबाबत कधी ऐकले नाही रस्ते ताब्यात घेण्याच्या या निर्णयाबाबत नगरपरिषदेचा ठराव झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक सदस्य असा कोणता ठराव झाल्याचे ऐकिवात नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या ठरावावर प्रश्नचिन्ह लागले आहे. हा ठराव आहे की नगरपरिषद प्रशासनाने आपल्या अधिकारात परस्परच बांधकाम खात्याला रस्ते ताब्यात घेण्याबाबतचे पत्र दिले याची जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. कारण आर्थिक संबंध असल्याने रस्ते ताब्यात घेण्याचा हा विषय धोरणात्मक आहे. कार्यक्रम पत्रिकेत या विषयाचा ‘वेळेवर येणारे विषय’ या सदराखाली समावेश करता येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेचा या रस्त्यांसंबंधीचा ठराव आणि प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.