शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 25, 2016 00:44 IST

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश याचिका फेटाळल्याने यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्थगनादेश याचिका फेटाळली : सर्वाधिक उलाढाल होणारी संस्था यवतमाळ : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगनादेश याचिका फेटाळल्याने यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात धान्याची सर्वाधिक उलाढाल असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीकडे शेतकरी, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. स्थानिक धामणगाव रोडवरील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये २०१४ मध्ये ४७ हमाल कार्यरत होते. त्यांनी यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीला लायसन्स मागितले. मात्र तत्कालीन सभापती सूर्यकांत गाडे पाटील यांनी यासाठी नकार दिला. याविरोधात यवतमाळ जिल्हा हमाल मापारी संघटनेतर्फे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली. ९ डिसेंबर २०१४ रोजी संघटनेच्या बाजूने निकाल लागल्याने बाजार समितीने ४७ हमालांना लायसन्स दिले. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी प्रसिध्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या मतदार यादीतून लायसन्सधारक ४७ मतदारांना वगळण्यात आले. या यादीवर संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे आक्षेप दाखल केला. जिल्हा उपनिबंधकांनी मतदार यादी दुरुस्त करत यादीत ४७ लायसन्सधारक मतदारांची नावे समाविष्ट केली. याविरोधात राजेंद्र तुकाराम बगमारे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २४२०/२०१६ ही याचिका दाखल केली. या याचिकेवरून न्यायमूर्ती एस. बी. सुकरे यांनी २६ एप्रिल रोजी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. पुढे या प्रकरणी न्यायमूर्ती एम. एम. हक यांच्यासमोर सुनावनी करण्यात आली. न्यायालयाने बगमारे यांची याचिका २१ जुलै २०१६ रोजी फेटाळली. निवडणूकप्रक्रियेतील अडथळे दूर झाले आहे. या प्रकरणात जिल्हा हमाल मापारी संघटनेच्यावतीने अ‍ॅड. एस.के. तांबडे, अ‍ॅड. घारे यांनी बाजू मांडली. (शहर वार्ताहर)